महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सीआयएसएफ जवानांची बाईक रॅलीतून जनजागृती - बाईक चालवताना हेल्मेट घालणे गरजेचे

रस्त्यावर बाईक चालवताना हेल्मेट घालणे गरजेचे असून त्यामुळे आपला जीव सुरक्षित राहतो आणि कुटूंबही आनंदित राहते, असा संदेश बाईक रॅलीच्या माध्यमातून जनजागृतीद्वारे सीआयएसएफ जवानांनी अलिबागकरांना दिला आहे.

सीआयएसएफ जवानांची बाईक रॅलीतून जनजागृती
सीआयएसएफ जवानांची बाईक रॅलीतून जनजागृती

By

Published : Feb 4, 2021, 6:14 PM IST

रायगड - बाईक चालवताना अनेक वेळा अपघातानंतर हेल्मेट नसल्याने बाईक चालकाचा मृत्यू होण्याच्या घटना घडतात. रस्त्यावर बाईक चालवताना हेल्मेट घालणे गरजेचे असून त्यामुळे आपला जीव सुरक्षित राहतो आणि कुटूंबही आनंदित राहते, असा संदेश बाईक रॅलीच्या माध्यमातून जनजागृतीद्वारे सीआयएसएफ जवानांनी अलिबागकरांना दिला आहे.

सीआयएसएफ जवानांची बाईक रॅलीतून जनजागृती

नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांचा रॅलीला हिरवा झेंडा
रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत अलिबाग थळ येथील आरसीएफ कंपनीतील सीआयएसएफ युनिटतर्फे केंद्र शासनाच्या सूचनेनुसार रास्ता सुरक्षा अभियान मोहीम हाती घेतली आहे. आरसीएफ कॉलनी गेट समोरून सीआयएसएफ जवानांनी बाईक रॅली काढली. या बाईक रॅलीला अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय सुरक्षा बल युनिट कमांडर औदेश प्रसाद, असिस्टंट कमांडर गुरमित सिंग, महेश सावंत, सीआयएसएफ जवान सहभागी झाले होते.

सीआयएसएफ जवानांची बाईक रॅलीतून जनजागृती
सीआयएसएफ जवानांनी शहरात काढली बाईक रॅलीकेंद्र शासनाच्या सूचनेनुसार 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान मोहीम सीआयएसएफने हाती घेतली आहे. अलिबाग आरसीएफ कॉलनीपासून ते समुद्र किनाऱ्यापर्यंत शहरात बाईक रॅली काढून रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी जवानांनी आपल्या बाईकला संदेश फलकही लावले होते. बाईक चालकाने हेल्मेट वापरा - युनिट कमांडर प्रसाद यांचे आवाहनबाईक चालवताना अपघात होऊन चालकाने हेल्मेट परिधान न केल्याने चालकाचा मृत्यू होण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे आपले जीवन वाचवण्यासाठी आणि कुटुंबाचा आधार टिकवण्यासाठी बाईक चालकांनी हेल्मेट वापरा, असा संदेश या बाईक रॅलीतून आम्ही देत असल्याचे युनिट कमांडर औदेश प्रसाद यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -फेरीवाल्यांकडून जमा केली जातेय खंडणी, मनसेचा सेनेवर गंभीर आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details