महाराष्ट्र

maharashtra

पनवेल महापालिकेच्या सुपरवायझरवर कामगांराचा चाकू हल्ला

By

Published : Sep 28, 2019, 6:53 PM IST

दिनेश राठोड, असे या कंत्राटी सुपरवायझरचे नाव आहे. दिनेश राठोड हा खारघरमधल्या कोपरा परिसरात राहत असून तो साई गणेश एंटरप्राइजेससाठी काम करतो.

सुपरवायझरवर कामगांराचा चाकूने हल्ला

रायगड- महापालिकेच्या एका कंत्राटी सुपरवायझर सफाई कामगारांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये सुपरवायझर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेमुळे पनवेल महापालिकेच्या कामगारांवरील हल्ल्याच्या घटनेने पुन्हा डोक वर काढले आहे. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना कोणी वाली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुपरवायझरवर कामगांराचा चाकूने हल्ला

दिनेश राठोड, असे या कंत्राटी सुपरवायझरचे नाव आहे. दिनेश राठोड हा खारघरमधल्या कोपरा परिसरात राहत असून तो साई गणेश एंटरप्राइजेससाठी काम करतो. रवी गुंजाळ आणि सिद्धार्थ गायकवाड हे दोघेही दिनेश राठोडकडे सफाई कामगार म्हणून काम करत होते. सकाळच्या सुमारास दिनेश राठोड हा खारघरमधल्या कोपरा परिसरातून जात असताना अचानक या दोन्ही सफाई कामगारांनी दिनेशवर चाकूने 3 वेळा वार केले आणि पळून गेले.

हेही वाचा - रायगडातील नर्सिंग महाविद्यालयाचे काम सहा वर्षानंतरही अपूर्णच; कोट्यवधीचा निधी खर्च

दरम्यान, जखमी अवस्थेत राठोड याने त्या ठिकाणाहून पळ काढला आणि या घटनेची माहिती महापालिका अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, खारघर पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन पुढील कायदेशीर कारवाई केली.

हेही वाचा - अलिबाग मतदार संघात 4 नवीन मतदान केंद्र: 375 मतदान केंद्रांवर होणार मतदान

गेल्या काही महिन्यात पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले वाढताना दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत पीडित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कुणी पाठीशी ही येत नसल्याने महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खचत आहे. त्यामुळे पनवेल महापालिका कर्मचाऱ्यांना कुणी वाली आहे का? असा सवाल येथील कर्मचाऱ्यांनी विचारला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details