रायगड- चंद्राभोवती रिंगण म्हणजेच चंद्राला खळे पडणे हा नैसर्गिक चमत्कार शुक्रवारी रात्री नागरिकांना पाहायला मिळाला आहे. ही एक खगोलीय संरचना असून, त्याला वैज्ञानिक आधार आहे. पृथ्वीच्या कक्षेमध्ये हिमकण आल्याने असे वलय चंद्राभोवती पडल्याचे दिसते. मात्र हे वलय पाहायला मिळाल्याने खगोलप्रेमी व निसर्ग प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
शिरस नावाच्या ढगांमुळे तयार होतं वलय
20 हजार फूटाच्या आसपास असणारे पांढरे ढग आपल्याला दिसत नाहीत, पण जेव्हा चंद्राचा प्रकाश त्या ढगांमधून जातो त्यामुळे आपल्याला चंद्राच्या भोवती एक प्रकाश वलय दिसू लागते. त्याला वैज्ञानिक भाषेत लुनार किंवा मून हॅलो इफेक्ट म्हणतात. वादळ आल्यानंतर 20 हजार फूट उंचीवर शिरस नावाचे ढग तयार होतात. या ढगांमध्ये हिमकण असतात. या हिमकणांमधून सूर्यकिरणे परावर्तित होतात. यावेळी हे हिमकण प्रिझमप्रमाणे काम करतात. सूर्याची किरणे जेंव्हा घन पदार्थ मधून जातात तेव्हा माध्यम बदलते व किरणांचे वक्रीकरण होते. यातूनच सूर्याभोवतीलचे खळं पाहावयास मिळते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून, ही संरचना पाहायला मिळाल्याने निसर्ग प्रेमींमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.