महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पेणमधील कारखान्यात कलाकारांची गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याची लगबग - पेणमधील व्यावसायिकांना आर्थिक फटका

गणेशोत्सव सुरु होण्यास काही तास शिल्लक असल्यामुळे पेणमधील कारखान्यामध्ये कलाकारांची गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरविण्याची लगबग सुरु आहे. मात्र, कोरोना प्रादुर्भावाचा फटका गणेश मूर्तीला बसला आहे. मूर्तिकारांना ग्राहकांची प्रतीक्षा असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत.

ganesh idol artist
गणेश मुर्ती कलाकार

By

Published : Aug 21, 2020, 4:33 PM IST

रायगड- गणरायाचे आगमन शनिवारी होत आहे. गणपतीचे माहेरघर असलेल्या पेण शहरासह तालुक्यातील कारखान्यात गणेश मूर्तींवर शेवटचा हात मारण्याची लगबग सुरू आहे. गणेशभक्त गणेश मूर्ती घेण्यासाठी एक दिवस आधीच येत असल्याने गणेशमूर्ती कारखान्यातील कलाकारांची मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याची लगबग वाढली आहे.

पेणमध्ये गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याची लगबग

रायगड जिल्ह्यातील पेण शहरासह तालुक्यात साधारण दीड हजार गणेश मूर्ती कारखाने आहेत. कोरोना व लॉकडाऊन, चक्रीवादळ यामुळे यावर्षी पेण तालुक्यातील गणेश मूर्ती व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे. दरवर्षी पेण तालुक्यातून सुमारे 150 कोटी रुपयांच्या गणेशमूर्ती संपूर्ण देशासह विदेशातही पाठवण्यात येतात. परंतु, यावर्षी 100 कोटींचाच व्यवसाय झाल्याने गणेश उद्योगाला 50 कोटींचा फटका बसला आहे.

हेही वाचा-ईटीव्ही भारत विशेष : कोल्हापुरात गाईच्या शेणापासून बनविल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमधील व्यापारी पेण तालुक्यातून होलसेलमध्ये गणेश मूर्ती नेऊन त्यांची विक्री करतात. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे अनेक ठिकाणी रेड झोन असल्याने व्यापाऱ्यांनी कमी प्रमाणात गणेश मूर्तींची खरेदी केली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, नगर, ठाणे, डोंबिवली, कल्याण यांंसह इतर शहरांमध्येे सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने तेथे मंडप टाकून गणेशमूर्ती विक्री करण्यास परवानगी नसल्याने याचा परिणाम विक्रीवर झाला आहे. गणेशाचे आगमन होण्यास अवघे काही राहिले असल्याने कारखानदारांची गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याची लगबग सुरु आहे. कारखानदार मूर्ती तयार करुन ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details