महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अर्णब गोस्वामींची रवानगी तळोजा कारागृहात - arnab goswami news

अर्णब गोस्वामी, फारुख शेख आणि नितेश सरडा या तिघांना आज सकाळी तळोजा कारागृहात हलविण्यात आले. अशी माहिती जिल्हा कारागृह अधीक्षक ए टी पाटील यांनी दिली आहे.

Arnab Goswami
अर्णब गोस्वामी

By

Published : Nov 8, 2020, 11:16 AM IST

रायगड - अर्णब गोस्वामी, फारुख शेख आणि नितेश सरडा या तिघांना आज सकाळी अलिबाग येथून तळोजा कारागृहात हलविण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने आणि हाय प्रोफाइल केस असल्याने जिल्हा कारागृह अधीक्षकांनी या तिघांना तळोजा येथे हलविण्याची मागणी वरिष्ठांकडे केली होती. त्यानुसार तुरुंग महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार तिघांनाही तळोजा कारागृहात हलविले आहे.

अर्णब गोस्वामी
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेले अर्णब , नितेश, फारुख हे हाय प्रोफाइल व्यक्ती आहेत. या तिघांना अलिबाग शहरातील शाळेच्या एका खोलीत ठेवण्यात आले होते. या तिघांना तळोजा येथे हलविण्याबाबत जिल्हा कारागृह अधीक्षक यांनी न्यायालयाला विनंती केली होती. न्यायालयाने वरिष्ठांची परवानगी घेऊन निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार तिघांनाही तळोजा कारागृहात हलविण्यात आले.

जिल्हा कारागृह अधीक्षक ए टी पाटील यांची माहिती-

जिल्हा कारागृह अधीक्षक यांनी तुरुंग महानिरीक्षक यांना याबाबत कळविले होते. त्यानंतर तुरुंग महानिरीक्षक यांनी तिघांना तळोजा येथे हलविण्याचे आदेश दिले. आज तिघांनाही सकाळी तळोजा कारागृहात हलविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कारागृह अधीक्षक ए टी पाटील यांनी दिली आहे.

अर्णब गोस्वामी यांच्या जामीन याचिकेवर निर्णय नाही-

सर्व पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर काल मुंबई उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांच्या जामीन याचिकेवरील निर्णय राखून ठेवला. तर न्यायमूर्ती एस.एस शिंदे व एस.एम कर्णिक यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला अन्वय नाईक यांच्या मृत्यू संदर्भात क्लोजर रिपोर्ट देणाऱ्या व तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात नोटीस बजावली. यावर राज्य सरकार न्यायलयात प्रतिज्ञापत्र सादर करेल.

अर्णब यांच्या पोलीस कोठडीबाबत आता 9 नोव्हेंबर रोजी सुनावणी-

अर्णब गोस्वामी यांच्या न्यायालयीन कोठडीवर पोलिसांनी केलेल्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी आता 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे. आरोपीच्या वकिलांनी इंग्रजीत नोटीस देण्याबाबतची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. तर उच्च न्यायालयात जामीन अर्जावर आणि एफआयआर रद्द करण्याबाबत सुनावणी असल्याने वेळ देण्याची मागणी आरोपीच्या वकिलांनी केली. त्यानुसार 9 नोव्हेंबर रोजी अलिबाग सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. अलिबाग जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जे. मल्लशेट्टी यांच्या न्यायलयात ही सुनावणी होत आहे.

हेही वाचा-अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : क्लोजर रिपोर्ट देणाऱ्या व तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात राज्य सरकारला नोटीस

हेही वाचा-आलिशान घरात राहणाऱ्या अर्णब यांना मराठी शाळेच्या रुममध्ये काढावी लागतेय रात्र!

ABOUT THE AUTHOR

...view details