महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अर्णबच्या पोलीस कोठडीबाबत आता 9 नोव्हेंबर रोजी सुनावणी.. - अर्णब गोस्वामी

अर्णब गोस्वामीच्या न्यायालयीन कोठडीवर पोलिसांनी केलेल्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी आता 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अलिबाग जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जे. मल्लशेट्टी यांच्या न्यायलयात ही सुनावणी होत आहे.

Arnab Goswami's police custody
अर्णब गोस्वामी

By

Published : Nov 7, 2020, 5:26 PM IST

Updated : Nov 7, 2020, 5:37 PM IST

रायगड - अर्णब गोस्वामीच्या न्यायालयीन कोठडीवर पोलिसांनी केलेल्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी आता 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे. आरोपीच्या वकिलांनी इंग्रजीत नोटीस देण्याबाबतची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. तर उच्च न्यायालयात जामीन अर्जावर आणि एफआयआर रद्द करण्याबाबत सुनावणी असल्याने वेळ देण्याची मागणी आरोपी वकिलांनी केली. त्यानुसार 9 नोव्हेंबर रोजी अलिबाग सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. अलिबाग जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जे. मल्लशेट्टी यांच्या न्यायलयात ही सुनावणी होत आहे.

अर्णब गोस्वामीच्या न्यायालयीन कोठडीवर सुनावणी पुढे ढकलली
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी, नितेश सरडा आणि फारुख शेख यांना रायगड पोलिसांनी 4 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. त्यानंतर अलिबाग न्यायालयात हजर केले असता तिघांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. याबाबत रायगड पोलिसांनी 5 नोव्हेंबर रोजी जिल्हा सत्र न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. यावर 7 नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती.आरोपीच्या वकिलांची इंग्रजीत नोटीशीची मागणी फेटाळली -आरोपीच्या वकिलांनी आरोपींना दिलेली पुनर्विचार याचिकेबाबतची नोटीस ही मराठीत द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. यावर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आक्षेप घेतला. न्यायालयाचे कामकाज हे मराठीत चालते. आरोपीचे वकील हे मराठी असून त्यांना मराठी वाचता येते. आरोपीचे वकील हे वेळकाढूपणा करीत आहेत. असा युक्तिवाद अ‌ॅड प्रदीप घरत यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने आरोपीच्या वकिलांनी केलेली मागणी फेटाळली आहे.सरकारपक्षातर्फे अ‌ॅड प्रदीप घरत नियुक्ती -अन्वय नाईक प्रकरणात सरकार पक्षातर्फे शासनाने अ‌ॅड प्रदीप घरत यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार आज अ‌ॅड प्रदीप घरत यांनी आजच्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे न्यायालयात बाजू मांडली.
Last Updated : Nov 7, 2020, 5:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details