रायगड -वास्तु रचनाकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केली आहे. दरम्यान, अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे अलिबाग जिल्हा कारागृह अधीक्षकांनी सांगितले.
रिपब्लिकचे संपादक-अँकर अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांनी लाखो रुपये थकविल्याने 4 मे 2018 रोजी इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी तिघांचा नावांचा उल्लेख करून सुसाईड नोट लिहिली होती. त्यानंतर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आता अर्णब यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
एका मराठी शाळेत होता अर्णब यांचा मुक्काम-
अर्णब यांना 4 नोव्हेबर रोजी रायगड पोलिसांनी अटक केली होती. त्यांना अलिबाग न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने गोस्वामी, सारडा आणि शेख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर अर्णब आणि दोघांना अलिबाग शहरातील एका मराठी शाळेत ठेवण्यात आले होते. ही शाळा कैद्यांसाठी कोविड सेंटर म्हणून बनविण्यात आली आहे. गोस्वामी, सारडा आणि शेख या शाळेत डासांच्या सोबतीने तीन रात्र काढल्या आहेत. दरम्यान, अर्णब यांना सुरक्षेच्या कारणास्तव तळोजा कारागृहात हलवणार आहेत.
अर्णब गोस्वामी यांच्या जामीन याचिकेवर निर्णय नाही-