महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : अर्णब गोस्वामींना 7 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे समन्स - anvay naik suicide news

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी, नितेश सरडा आणि फिरोज शेख यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रायगड पोलिसांनी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे.

Arnab Goswami
अर्णब गोस्वामी

By

Published : Dec 16, 2020, 6:00 PM IST

Updated : Dec 16, 2020, 6:11 PM IST

रायगड -अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी 1800 पानी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले आहे. याबाबत आज मुख्य न्यायदंडाधिकारी सुनयना पिंगळे यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. आरोपींविरोधात दाखल केलेल्या दोषारोप पत्राची दखल न्यायालयाने घेतली असून, अर्णब गोस्वामी, नितेश सरडा आणि फिरोज शेख या तिघांना न्यायालयाने समन्स जारी केले आहेत. त्यामुळे 7 जानेवारीला तीनही आरोपींना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी दिली आहे.

प्रदिप घरत - विशेष सरकारी वकील

अर्णबसह दोघांना समन्स जारी

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी, नितेश सरडा आणि फिरोज शेख यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रायगड पोलिसांनी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे. पोलिसांनी दाखल केलेले दोषारोप पत्राची न्यायालयाने दखल घेतली आहे. त्यामुळे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची सुनावणी 7 जानेवारीपासून सुरू होणार आहे. यासाठी तिन्ही आरोपींना न्यायालयाने समन्स जारी केले आहे.

न्यायालयाने घेतली दखल

दोषारोप पत्राबाबत आरोपी पक्ष उच्च न्यायालयात गेले आहेत. याबाबत न्यायालयाने पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्राची दखल घेऊ नये असा युक्तिवाद केला. तर उच्च न्यायालयाने वा सर्वोच्च न्यायालयाने याबाबत कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे हा खटला सुरू रहावा असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला. न्यायदंडाधिकारी यांनी दोघांचा युक्तिवाद ऐकून दाखल केलेल्या दोषारोप पत्राची दखल घेतली आहे. अर्णबसह दोघांना 7 जानेवारी रोजी हजर राहण्याचे समन्स न्यायालयाने पाठवले आहेत.

Last Updated : Dec 16, 2020, 6:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details