महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा नियोजन बैठकीत 247 कोटीच्या विकास आराखड्याला मंजुरी - जिल्हा नियोजन बैठक

नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत विविध योजना जिल्ह्यात राबविणार असून 247.53 कोटींचा विकास आराखडा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर झाला.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकितील छायाचित्र
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकितील छायाचित्र

By

Published : Jan 20, 2020, 5:18 PM IST

रायगड - जिल्ह्याचा 247.53 कोटींचा आराखडा आज (दि. 20 जाने.) जिल्हा नियोजन बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. आणखी 45 कोटींच्या वाढीव निधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी करणार असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी 'डीपीडीसी' च्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

बोलताना पालकमंत्री

जिल्ह्यात नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येणार असून यामध्ये स्पीड बोट रूग्णवाहीका, अंगणवाडी बांधकाम, मुलींना सायकल वाटप, स्मशानभूमी शेड, घनकचरा व्यवस्थापन कामे, नगरपालिका, नगरपंचायत, सीसीटीव्ही बसविणे ही घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन भवनात जिल्हा नियोजन समिती बैठक पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार रवींद्र पाटील, राजीप अध्यक्ष योगिता पारधी, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, सदस्य, सर्व अधिकारी बैठकीला उपस्थित होते. जिल्हा नियोजन बैठकीनंतर पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा - पत्नीला तब्बल आठ महिन्यांनी मिळाला पतीचा मृतदेह; सौदी अरेबियात झाला होता मृत्यू

नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत जिल्ह्यातील 1200 हुन अधिक स्मशानभूमीना शेड नाहीत, त्यांना जनसुविधा अंतर्गत शेड लावून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील नगरपंचायत, नगरपालिकामध्ये सीसीटीव्ही लावले नाहीत, त्यासाठी निधीची मागणी शासनाकडे करत असल्याचे पालकमंत्री तटकरेंनी सांगितले. नागरी सुविधा अंतर्गत येणाऱ्या निधीतून 5 हजार लोकवस्ती असलेल्या ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापन बाबत कामे सुचविण्याच्या सूचना केल्या असून लगतच्या ग्रामपंचायतींनाही यात सामावून घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

हेही वाचा - भरदिवसा लाखो रूपयांची चोरी; लातुरातील धक्कादायक प्रकार

अंगणवाडीसाठी उपलब्ध होत असलेल्या निधीतून ज्या गावात अद्यापही अंगणवाडीची इमारत नाही. त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर नावीन्यपूर्ण योजने अंतर्गत स्पीड बोट रूग्णवाहीकेसाठी 5 कोटीची मागणी शासनाकडे करीत आहोत. जेणेकरून अतिदक्ष रुग्णांना मुंबई येथे बोटीने नेऊन त्वरित उपचार मिळणे शक्य होणार आहे. याबाबतची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 5 ते 6 किलोमीटर पर्यंत शाळा प्रवास करणाऱ्या मुलींना सायकल वाटप करण्याची योजना नावीन्य पूर्ण योजनेत घेतली आहे. असल्याचेही पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा - धुक्यात हरवले लातूरकर; मात्र, ढगाळ वातावरणाचा पिकांना धोका

ABOUT THE AUTHOR

...view details