रायगड -अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाबाबत रायगड पोलिसांनी मुख्य न्यायदंडाधिकारी अलिबाग यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे. या खटल्याची सुनावणी अलिबाग येथे मुख्य न्यायदंडाधिकारी याच्या न्यायलायत आज ७ जानेवारीपासून सुरू होत आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सरडा यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स न्यायालयाने काढले होते. त्यामुळे आजच्या सुनावणीवेळी तिन्ही आरोपी हजार राहणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायलायत खटला सुरू
अर्णब गोस्वामी, नितेश सरडा आणि फिरोज शेख या तिघांवर अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी याच्या न्यायालयात पोलिसांनी 1800 पानी दोषारोप पत्र 4 डिसेंबर 2020 रोजी दाखल केले होते. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी दोषारोप पत्र दाखल करून घेऊन अर्णबसह दोघांना 7 जानेवारी रोजी हजर राहण्याबाबत समन्स जारी करण्यात आले होते.