महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अन्वय नाईक प्रकरण : पुनर्विचार याचिका व आरोपीच्या जामीनावर गुरुवारी होणार निर्णय, उद्या सरकारी वकील देणार उत्तर - अन्वय नाईक पुनर्विचार याचिका

जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असलेल्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील रायगड पोलिसांच्या पुनर्विचार याचिका आणि आरोपीच्या जामिनावर उद्या गुरुवारी 12 नोव्हेबर रोजी निकाल दिला जाणार आहे.

Anvay Naik case:
अन्वय नाईक प्रकरण

By

Published : Nov 10, 2020, 8:21 PM IST

Updated : Nov 10, 2020, 8:38 PM IST

रायगड - जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असलेल्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील रायगड पोलिसांच्या पुनर्विचार याचिका आणि आरोपीच्या जामिनावर उद्या गुरुवारी 12 नोव्हेबर रोजी निकाल दिला जाणार आहे. त्यामुळे दोन दिवस तीनही आरोपींना तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत काढावे लागणार आहेत. आज पुनर्विचार याचिकेवरील दोन्ही पक्षाचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत.

पुनर्विचार याचिकेवर दोन्ही पक्षाचा युक्तिवाद पूर्ण -

रायगड पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्णब गोस्वामी याच्या न्यायालयीन कोठडीबाबत पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर चार दिवसांपासून जिल्हा सत्र न्यायाधीश आर जे मल्लशेट्टी यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पुनर्विचार याचिकेबाबत आरोपी नितेश सारडा यांच्यामार्फ़त मेंटेनेबल अर्ज दाखल केला होता. तो अर्ज सकाळच्या सत्रात न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर दिवसभरात आरोपी पक्षातर्फे पुनर्विचार याचिकेवरील युक्तिवाद पूर्ण करण्यात आला. आरोपीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावर विशेष सरकारी वकील अ‌ॅड. प्रदीप घरत यांनी आपले म्हणणे मांडले.

पुनर्विचार याचिकेसंदर्भात माहिती देताना सरकारी वकील
सरकारी पक्षातर्फे बुधवारी आरोपीच्या युक्तिवादावर देणार उत्तर -आरोपीच्या वकिलांनी आज सत्र न्यायालयात आरोपींच्यावर लावलेली कलमे कशी चुकीचे आहेत, यावर युक्तिवाद केला आहे. आरोपीच्या वकिलानी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर सरकारी वकील हे उद्या आपले म्हणणे मांडणार आहेत.पुनर्विचार याचिकेवरील निर्णयानंतर जामीन अर्जाचा निकाल -आरोपी पक्षातर्फे जामीन अर्जावर उद्या सुनावणी घेण्याबाबत आग्रह धरण्यात आला होता. याला सरकारी वकील अॅड भूषण साळवी यांनी आक्षेप घेतला आहे. मेंटेनेबल अर्ज हा आरोपी पक्षाचा फेटाळला असल्याने पुनर्विचार याचिका ही योग्य आहे. त्यामुळे या याचिकेवर आधी निकाल व्हावा त्यानंतर जामीन अर्जावर सुनावणी सुरू करा, असे मत अॅड भूषण साळवी यांनी मांडले आहे.

आरोपीच्या पोलीस कोठडीसाठी सरकारी वकिलांचा प्रयत्न -

पुनर्विचार याचिकेबाबत आज सरकारी वकील हे म्हणणे मांडणार आहेत. न्यायालय हे म्हणणे ऐकल्यानंतर गुरुवारी पुनर्विचार याचिका आणि जामीन अर्जावर निकाल देणार आहेत. जामीन अर्जावर विशेष सरकारी वकील हे कडाडून विरोध करणार असून आरोपींना पोलीस कोठडी मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विशेष सरकारी वकील अॅड प्रदीप घरत यांनी म्हटले आहे.

Last Updated : Nov 10, 2020, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details