महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाड शहरात घुसलेल्या मगरींना पकडण्यात 'सिस्केप' या प्राणी मित्र संघटनेला यश - 'सिस्केप' प्राणी मित्र संघटना

अतिवृष्टीमुळे महाड शहरात पाच दिवस पूरस्थिती निर्माण झाली. सावित्री नदीमध्ये असलेल्या मगरी पुराच्या पाण्यासोबत नागरी वस्तीत घुसल्याने नागरिक भयभीत झाले होते. शहरात घुसलेल्या मगरींपैकी दोन महाकाय मगरींना पकडण्यात 'सिस्केप' या प्राणीमित्र संघटनेला यश आले आहे.

महाड शहरात घुसलेल्या मगरींना पकण्यात 'सिस्केप' या प्राणी मित्र संघटनेला यश

By

Published : Aug 10, 2019, 12:01 AM IST

रायगड - महाडमधील सावित्री नदीत असलेल्या मगरी, पुरामुळे नागरी वस्तीत घुसत आहेत. शहरात घुसलेल्या मगरींपैकी दोन महाकाय मगरींना पकडण्यात 'सिस्केप' या प्राणी मित्र संघटनेला यश आले आहे. पकडलेल्या मगरींना पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडण्यात आले आहे. मगर पकडण्याचा हा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

महाड शहरात घुसलेल्या मगरींना पकण्यात 'सिस्केप' या प्राणी मित्र संघटनेला यश
महाड तालुक्यात अतिवृष्टीमुळे सावित्री नदीला पुर आला आहे. त्यामुळे महाड शहरात पाच दिवस पूरस्थिती निर्माण झाली. सावित्री नदीमध्ये असलेल्या मगरी पुराच्या पाण्यासोबत नागरी वस्तीत घुसल्या होत्या. शहरातील हापुस तळा, सुकट गल्ली, सरेकर आळी, दस्तुरीनाका, काकरतळे परिसरात मगरी दिसल्या होत्या. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते.'सिस्केप' या प्राणी मित्र संघटनेने शहरात घुसलेल्या या मगरींचा शोध सुरू केला. काकर तलाव, दस्तुरी नाका येथे मगरी दिसल्या. त्यानंतर संघटनेने मगरींचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. मगर पकडण्यासाठी लागणारी कोणतीही अद्ययावत साधने नसताना, केवळ परिस्थिती आणि अभ्यासाच्या जोरावर 'सिस्केप'च्या सदस्यांनी शहरात घुसलेल्या मगरींना पकडले. 'सिस्केप' संघटनेच्या सदस्यांनी शहरात मगर दिसल्यानंतर त्यांच्यासोबत सेल्फी, व्हिडीओ, फोटो काढू नये. तसेच वन विभागाला व सिस्केप संस्थेला कळवा असे, आवाहन नागरिकांना केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details