महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पवारसाहेबांचे सर्व दात पडले असून; आता फक्त सुळेच शिल्लक, गीतेंची बोचरी टीका - anant gite speech in raigad

पवारसाहेबांची सर्व दात पडले असून, आता फक्त सुळेच शिल्लक राहिले असल्याची बोचरी टीका शिवसेना नेते अनंत गीतेंनी केली.

गीतेंची शरद पवारांवर बोचरी टीका

By

Published : Oct 12, 2019, 2:16 PM IST

रायगड - राष्ट्रवादी पक्षाला सर्वजण कंटाळले असून, संपूर्ण पक्ष महाराष्ट्रात संपण्याच्या मार्गावर आहे. सर्व नेते शरद पवारांना सोडून चालले आहेत. पवारसाहेबांची सर्व दात पडले असून, आता फक्त सुळेच शिल्लक राहिले असल्याची बोचरी टीका शिवसेना नेते अनंत गीतेंनी केली.

म्हसळा शहरातील धाविर मंदिर प्रांगणात युतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. यावेळी बोलताना अनंत गीतेंनी शरद पवारांसह सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका केली.

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला आणि भ्रष्टाचारी सुनील तटकरे यांचा विजय झाला. आता मतदारांनी विनोद घोसाळकर यांना मतदान चूक सुधारण्याची वेळ आली असल्याचे गीते म्हणाले.

गीतेंची शरद पवारांवर बोचरी टीका

हेही वाचा - शिवसेनेचा वचननामा जाहीर; शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासह अनेक आश्वासनांचा पाऊस

हेही वाचा - महाबलीपूरमच्या किनाऱ्यावर मोदींचे स्वच्छता अभियान, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा दिला संदेश

सत्तेचा वापर पैशासाठी, दरेकरांचा तटकरेंवर निशाणा
आमदार प्रवीण दरेकर यांनी तटकरे कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. गेली अनेक वर्षे सत्तेचा वापर पैशांसाठी, पैशांचा वापर दबावासाठी करण्याचे काम तटकरे या जिल्ह्यात करीत आहेत. गावांमध्ये भांडणे लावणे, केवळ विकासाचा दिखावा करणे, काम मात्र शून्य ही तटकरे यांची प्रवृती असल्याचे दरेकर म्हणाले. तटकरे कुटुंब सत्तेतून पैसा आणि पैसे वाटून पुन्हा सत्तेत येते. तटकरे हे सत्तेतून भ्रष्टाचाराचा उन्माद घालत असल्याचेही दरेकर म्हणाले. ज्या सभेत महिलांची गर्दी जास्त असते त्या उमेदवारचा विजय निश्चित असतो असेही दरेकर म्हणाले.

गेल्या १० वर्षात या मतदारसंघावर अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या तटकरे कुटुंबाला या मतदारसंघातून नेस्ताभूत करण्याचे आवाहन दरेकर यांनी केले. श्रीवर्धन मतदार संघातील तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून या मतदार संघाच्या विकाससाठी दोन तीन प्रकल्प आणणार असल्याचे दरेकर म्हणाले. त्या प्रकल्पासाठी अर्थ सहाय्य मुंबई बँक देत असल्याचेही ते म्हणाले.

उद्धव साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याचे सोने करणार आहे. आता श्रीवर्धन मतदार जिंकूनच मातोश्रीवर जाणार असल्याचे उमेदवार विनोद घोसळकर यांनी सांगितले. या सभेच्या शेवटी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी उपस्थित सर्वांना भ्रष्टाचारी प्रवृत्तीला गाढण्याची शपथ दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details