रायगड- जरा काही चांगलं झालं की शिवसेना म्हणते आमचं युतीचं सरकार. मात्र, नाशिक दौऱ्यात मोदींनी युतीचा ‘य’ सुद्धा उच्चारला नाही. मुंबईला उद्धव ठाकरे यांना छोटे भाई म्हणाले. पण आज भाई पण नाही, छोटे पण नाही, मोठे पण नाही, असा टोला राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला लगावला.
नाशिक दौऱ्यात मोदींनी युतीचा ‘य’ सुद्धा उच्चारला नाही- अमोल कोल्हे - शिवस्वराज्य यात्रा रायगड
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी रायगडमध्ये झालेल्या शिवस्वराज्य यात्रेत शिवसेनेवर युती बाबत टीका केली. जरा काही चांगलं झालं की शिवसेना म्हणते आमचं युतीचं सरकार. मात्र, मोदींनी नाशिकमध्ये झालेल्या सभेत युतीचा 'य' सुद्धा उच्चारला नसल्याची टीका त्यांनी केली.
![नाशिक दौऱ्यात मोदींनी युतीचा ‘य’ सुद्धा उच्चारला नाही- अमोल कोल्हे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4496111-371-4496111-1568953581228.jpg)
अमोल कोल्हे
श्रीवर्धन येथील सभेत बोलताना अमोल कोल्हे
राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा गुरूवारी श्रीवर्धन येथे आली. सभेच्या वेळी पाऊस सुरू असतानाही भरपावसात झालेल्या सभेत कोल्हे बोलत होते. पाच वर्षात 1 लाख 42 हजार कंपन्या बंद पडल्या. गेल्या 45 वर्षात नव्हती इतकी बेकारी वाढली. आज तरूणांच्या हाताला काम नाही त्यांच्या डोळयासमोर भवितव्याचे प्रश्नचिन्ह उभे राहिल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी खासदार सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे आदी उपस्थित होते.
Last Updated : Sep 20, 2019, 10:01 AM IST