रायगड -संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या आंबेनळी बस दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. याची आठवण म्हणून दापोलीमधील फ्रेंडस् क्लब या संस्थेने आंबेनळी घाटात अपघात स्थळी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या निमित्ताने मृतांचे नातेवाईक आणि बचाव कार्यात सहभागी झालेले ट्रेकर्स उपस्थित होते.
आंबेनळी बस दुर्घटनेला १ वर्ष पूर्ण, अपघातस्थळी नातेवाईकांसह मित्र परिवाराने वाहिली श्रद्धांजली - Trekkers
दापोली कृषी विद्यापीठातील ३० कर्मचाऱ्यांचा बळी घेणाऱ्या आंबेनळी बस दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले.
आंबेनळी बस दुर्घटनेतील लोकांना श्रद्धांजली वाहताना नागरिक
दापोली कृषी विद्यापीठातील ३० कर्मचाऱ्यांचा बळी घेणाऱ्या या अपघाताच्या तपासाबाबत मृतांच्या नातेवाईकांनी खंत व्यक्त केली. तर अकाली अपघाती मृत्यू ओढवलेल्या मित्रांच्या आठवणीत सुसज्ज रुग्णवाहिका आणण्याचा संकल्प फ्रेंडस् क्लबने केला. यावेळी मृतांच्या वारसांनी अनुकंपातत्त्वावर नोकरीची सरकारकडे मागणी केली.