महाराष्ट्र

maharashtra

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चाकरमान्यांकडे पुढाऱ्यांच्या पायघड्या

By

Published : Sep 25, 2019, 3:00 PM IST

Updated : Sep 26, 2019, 4:00 AM IST

विधानसभा पाच वर्षांनी येत असल्याने मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांना भेटण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षात चढाओढ लागली आहे. त्यामुळे चाकरमानी यांचा सध्या चांगलाच भाव वाढलेला दिसत आहे. मात्र निवडणुका झाल्यानंतर या चाकरमान्यांना लोकप्रतिनिधीकडे उबरडे झिजवावे लागणार आहेत. मात्र, तूर्तास तरी संभाव्य उमेदवार व नेते निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांकडे येत असल्याने चाकरमानी खुश दिसत आहेत.

मतदार

रायगड- राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते, संभाव्य उमेदवार प्रचाराला लागले आहेत. जिल्ह्यातील अनेक मतदार हे मुंबई, उपनगर, ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरात कामासाठी आहेत. या मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी राजकीय पक्षांची आता चढाओढ सुरू झाली आहे.

रायगडातील निवडणूक आढावा

हेही वाचा - शरद पवारांमध्ये अशी काय आहे 'पॉवर'? ज्यामुळे घाबरतंय भाजप ?

तुमच्या भागातील विकास आम्हीच करू, अशी आशा या मतदारांना दाखवून मताचा जोगवा राजकीय नेते मागत आहेत. त्यामुळे मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांची आठवण राजकीय पक्षांना पाच वर्षांनी आलेली असल्याने चाकरमान्यांचा भाव वाढलेला आहे.

रायगड जिल्हा हा मुंबईला लागून असल्याने जिल्ह्यातील अनेक रायगडवासी हे नोकरी धंद्यानिमित मुंबई, ठाणे, उपनगर असलेल्या शहरात स्थायिक झालेले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात असलेल्या मतदाराकडे राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी जातच असतात. मात्र, नोकरीनिमित्त बाहेर असणाऱ्या मतदार नागरिकांना भेटण्यासाठी राजकीय पक्षांचे नेते मुंबई, ठाणे तसेच उपनगर शहरात धाव घेताना दिसत आहेत.

हेही वाचा - ईडी हे दुधारी शस्त्र..! सत्ताधाऱ्यांनी त्याचा वापर विचारपूर्वक करावा - छगन भुजबळ

जिल्ह्यातील मतदार नोकरीनिमित्त बाहेर असल्याने या मतदारांना एकत्रित भेटून त्यांच्या बैठकांचे आयोजन विविध पक्षांकडून सुरू झाले आहे. चाकरमानी हे गावाच्या विकासाच्या दृष्टीने आपल्या समाजबांधवांसह मंडळे स्थापन करून हातभार लावत असतात. मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांना गावात मान असतो. त्यामुळे या चाकरमान्यांची बैठक लावून आपल्याच पक्षाला मत द्या, तुमच्या गावाचा विकास आम्हीच करू शकतो. अशी भाबडी आशा राजकीय नेते देत आहेत.
विधानसभा पाच वर्षांनी येत असल्याने मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांना भेटण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षात चढाओढ लागली आहे. त्यामुळे चाकरमानी यांचा सध्या चांगलाच भाव वाढलेला दिसत आहे. मात्र निवडणुका झाल्यानंतर या चाकरमान्यांना लोकप्रतिनिधीकडे उबरडे झिजवावे लागणार आहेत. मात्र, तूर्तास तरी संभाव्य उमेदवार व नेते निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांकडे येत असल्याने चाकरमानी खुश दिसत आहेत.

Last Updated : Sep 26, 2019, 4:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details