रायगड - पावसाळा सुरू झाला की, पर्यटकांची पावले आपोआप रायगडातील नैसर्गिक धबधबे आणि धरणांकडे वळतात. यावर्षी मात्र, कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील पर्यटनाला घरघर लागली आहे. कोरोनामुळे पर्यटनाचा उन्हाळी हंगामही गेला आणि आता पावसाळी हंगामही जाण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होऊनही पर्यटन स्थळे सामसूम दिसत आहेत.
कोरोनाने पावसाळी पर्यटनही केले लॉकडाऊन; रायगडमधील पर्यटन स्थळे ओस - रायगड पर्यटन न्यूज
जिल्ह्यात अलिबाग, मुरुड, कर्जत, खालापूर, खोपोली, श्रीवर्धन, रोहा, महाड, पोलादपूर, माथेरान या तालुक्याच्या अनेक भागात पावसाळ्यात नैसर्गिक धबधबे तयार होतात. दरवर्षी मुंबई, उपनगर, ठाणे, पुणे या शहरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक हे जिल्ह्यातील विविध भागात असलेल्या धबधबे व धरणांवर मौज मजा करण्यासाठी येतात. यावर्षी कोरोनामुळे प्रशासनाने पावसाळी पर्यटनाला बंदी घातली आहे.
जिल्ह्यात अलिबाग, मुरुड, कर्जत, खालापूर, खोपोली, श्रीवर्धन, रोहा, महाड, पोलादपूर, माथेरान या तालुक्यात अनेक भागात पावसाळ्यात नैसर्गिक धबधबे तयार होतात. तसेच धरणांवरही पर्यटक मोठ्या संख्येने जातात. दरवर्षी मुंबई, उपनगर, ठाणे, पुणे या शहरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक हे जिल्ह्यातील विविध भागात असलेल्या धबधबे व धरणांवर मौज मजा करण्यासाठी येतात. या पर्यटकांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था स्थानिक व्यावसायिकांकडून केली जाते. पावसाळ्यात येथील व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते.
सध्या पावसाळी पर्यटन हंगाम सुरू झाला असून डोंगरांतून नैसर्गिक धबधबे वाहू लागले आहेत. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे जिल्हा प्रशासनाने धबधबे, धरण या ठिकाणी जाण्यास बंदी घातली आहे. पावसाळी पर्यटनावरही कोरोनाची टांगती तलावर राहिल्याने स्थानिक व्यावसायिकांचा हा पावसाळी हंगामही बुडाला आहे.