महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अलिबागमध्ये कर्नाटक सरकार विरोधात शिवसैनिकांनी केली घोषणाबाजी - raigad shivsena latest news

अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा चौकात शिवसेनेने कर्नाटक सरकारचा घोषणाबाजी करून जाहीर निषेध केला. यावेळी राजीप विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी, संघटक सतीश पाटील, शहरप्रमुख संदीप पालकर, विभागप्रमुख शंकर गुरव, नंदू पाटील मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

alibaug shivsena protests against karnatak government for chhatrapati shivaji maharaj statue
alibaug shivsena protests against karnatak government for chhatrapati shivaji maharaj statue

By

Published : Aug 9, 2020, 2:25 PM IST

रायगड- छत्रपती शिवाजी महाराज यांचा बेळगावमधील मनगुत्ती गावामधील पुतळा हलविल्याबाबत शिवभक्तांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. अलिबाग शिवसेनेकडून कर्नाटक सरकारच्या या निंदनीय कृत्याबाबत जाहीर निषेध करण्यात आला. कर्नाटक सरकारचा प्रतिकात्मक पुतळा बनवून त्याला जोडे आणि लाथा मारून निषेध केला. यावेळी शिवसैनिकांनी कर्नाटक सरकार विरोधात घोषणाबाजी करून आपला संताप व्यक्त केला.

अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा चौकात, शिवसेनेने कर्नाटक सरकारचा घोषणाबाजी करून जाहीर निषेध केला. यावेळी राजीप विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी, संघटक सतीश पाटील, शहरप्रमुख संदीप पालकर, विभागप्रमुख शंकर गुरव, नंदू पाटील मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

बेळगावमधील मनगुत्ती ग्रामपंचायती हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविला होता. हा पुतळा काढण्यात आल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. कर्नाटक सरकारच्या या कृत्याबद्दल सगळीकडून त्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. पक्षाने आदेश दिल्यास कर्नाटक राज्यात जाऊन त्याठिकाणी निषेध व्यक्त करू असे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे आणि तालुकाप्रमुख राजा केणी यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details