रायगड -अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनतर्फे सामाजिक बांधिलकी जपत पेण तालुक्यातील कणे येथे पूरग्रस्त वाघरण गावात जाऊन गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. आठवडा भर कोसळणारा पाऊस, सोसाट्याचा वार यामुळे पेण तालुक्यातील गावाना पूर परिस्थीति निर्माण झाली आहे. पूरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि घराचे अतोनात नुकसान झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी पूरजन्य परिस्थिति निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांना अनेक सामाजिक संस्थांकडून मदतीचा ओघ सुरु आहे. सामाजिक बांधिलकी जपत अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशचे सदस्य, इतर फोटोग्राफर्स, प्रेस फोटोग्राफर्स यांनी पेण तालुक्यातील ग्रामपंचायत कणेमधील वाघरण वाडी येथील पूरग्रस्त 40 कुटुंबीयांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी पूरजन्य परिस्थिति निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांना अनेक सामाजिक संस्थांकडून मदतीचा ओघ सुरु आहे. सामाजिक बांधीलकी जपत अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशचे सदस्य, इतर फोटोग्राफर्स, प्रेस फोटोग्राफर्स यांनी पेण तालुक्यातील ग्रामपंचायत कणेमधील वाघरण वाडी येथील पूरग्रस्त 40 कुटुंबीयांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये तांदूळ, डाळ, तेल, कांदे, बटाटी, बिस्कीट पुडे आणि इतर प्रकारच्या साहित्याचे वाटप करून खारीचा वाटा म्हणुन मदतीचा हात दिला आहे.
यावेळी रायगड फोटोग्राफर्स असोसिएशनचे सचिव समीर भायदे, खजिनदार जितेंद्र मेहता, सल्लागार चंद्रकात धुमाळ, कणे वाघरणचे सरपंच हरीचंद्र म्हात्रे, सदस्य धिरज पाटील इतर ग्रामपंचायत सदस्य, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर मालोदे, उपाध्यक्ष तुषार थळे, कार्याध्यक्ष सचिन म्हात्रे, सचिव अमोल नाईक, खजिनदार राकेश दर्पे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कार्लेकर, सागर सावंत, समाधान पाटील, प्रकाश माळी, सुनील म्हात्रे, अश्विनी मेहता आदी उपस्थित होते.