महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' लाचखोर महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह वनपालाला 3 दिवसांची पोलीस कोठडी

लाकडे साठवण्याचा परवाना नसताना फर्निचर बनवणाऱ्या व्यक्तीकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना ललिता सूर्यवंशी आणि बापू गडदे यांना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली होती.

vad
वडखळ वनपरिक्षेत्राच्या अधिकारी ललिता सूर्यवंशी

By

Published : Jan 4, 2020, 8:58 PM IST

रायगड -तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेल्या वडखळ(ता. पेण) वनपरिक्षेत्रच्या महिला अधिकारी ललिता सूर्यवंशी आणि वनपाल बापू गडदे यांना अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. याप्रकरणी न्यायालयाने या दोघांनाही सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा -तीस हजारांची लाच घेताना वडखळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला अटक; अलिबाग लाचलुचपत विभागाची कारवाई

लाकडे साठवण्याचा परवाना नसताना फर्निचर बनवणाऱ्या व्यक्तीकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना ललिता सूर्यवंशी आणि बापू गडदे यांना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली होती. शासकीय अधिकारी, कर्मचारी काम करण्याच्या बदल्यात लाच मागत असतील तर, लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी '02141-222331' या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, यावेळी पोलीस उपअधीक्षक अधिकराव पोळ यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details