अलिबाग एसटी डेपोतील 31 चालक-वाहक निलंबित - alibuag st bus depot news
28 ऑगस्टला अलिबाग एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांना पनवेल दादर, अलिबाग दादर अशा ड्युटी लावल्या होत्या. याबाबत कर्मचारी यांना व्हाटसऍपच्या माध्यमातूनही सांगण्यात आले होते. तर कार्यालयातही ड्युटी बाबत बोर्डावर सूचना केल्या होत्या.
![अलिबाग एसटी डेपोतील 31 चालक-वाहक निलंबित alibauag st depot driver conductor suspend](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10:24:26:1596430466-mh-rai-01-stworker-slug-7203760-03082020102115-0308f-1596430275-495.jpg)
रायगड- अलिबाग एसटी आगारातील चालक वाहक यांनी कामावर येण्यास नकार दिल्याने 31 जणांवर जिल्हा वाहतूक नियंत्रक यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कोरोना काळात बेरोजगार होऊन मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे.
28 ऑगस्टला अलिबाग एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांना पनवेल दादर, अलिबाग दादर अशा ड्युटी लावल्या होत्या. याबाबत कर्मचारी यांना व्हाटसऍपच्या माध्यमातूनही सांगण्यात आले होते. तर कार्यालयातही ड्युटी बाबत बोर्डावर सूचना केल्या होत्या. मात्र, चालक व वाहक यांनी आदेशाचे पालन केले नाही. प्रवाशामधूनही याबाबत तक्रारी करण्यात आल्याने एसटीची प्रतिमा मालिन झाली. चालक व वाहक हे ड्युटीवर हजर न झाल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
कोरोना काळात जिल्ह्याअंतर्गत वाहतूक करण्याचे आदेश असतानाही जिल्ह्याबाहेर ड्युटी लावली जात आहे. याबाबत आम्ही सांगूनही जबरदस्तीने बाहेर ड्युटी लावली जात आहे. जिल्हाअंतर्गत ड्युटी करू असेही प्रशासनाला सांगण्यात आले असतानाही आमच्यावर निलंबनाची कारवाई केली असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. आधीच कोरोनामुळे तीन महिने पगार नाही, मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. अनेक कर्मचारी आज मोलमजुरी करून कुटूंबाचा चरितार्थ चालवत आहेत. असे म्हणणे निलंबित कर्मचाऱ्यांचे आहे.