अलिबाग : अलिबागच्या तहसीलदार मिनल दळवी यांना नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या पथकाने दोन लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले ( Alibaug Tehsildar caught red handed ) आहे. अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांना ताब्यात घेण्यात आले. अलिबाग तहसीलदार मिनल दळवी यांनी तक्रारदाराकडे काम करून देण्यासाठी लाचेची मागणी ( Alibaug Tehsildar Minal Dalvi ) केली होती.
Alibag Tehsildar : अलिबागच्या तहसीलदार यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने लाच घेताना पकडले रंगेहाथ - Alibaug Tehsildar Minal Dalvi
अलिबागच्या तहसीलदाराला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले ( Alibaug Tehsildar caught red handed ) आहे. मिनल दळवी यांना नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या पथकाने ( Alibaug Tehsildar Minal Dalvi ) दोन लाखाची लाच घेताना पकडले.
लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले : दोन लाखावर तडजोड करत दळवी यांनी काम करून देण्याची हमीही दिली होती. तक्रारदाराला दोन लाख रुपये घेऊन तहसीलदार दळवी यांनी त्यांच्या गोंधळपाडा येथील निवासस्थानी बोलावले. याबाबत तक्रारदाराने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ( Anti Corruption Bureau Department ) माहिती दिल्यानंतर दळवी यांना दोन लाखाची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. लाच लुचपत विभागाने तहसीलदार दळवी यांना अटक करताच त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना ताबडतोब जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक ज्योती देशमुख, पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे आणि पथकाने ही कारवाई केली.