रायगड- अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील 47 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या चारवर पोहचली आहे.
अलिबाग तालुक्यातील महिला कोरोना पॉझिटिव्ह; तालुक्यातील संख्या 4 वर - कोरोना न्यूज ईटिव्ही
कोरोनाबाधित महिलेचा पती मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत होता. महिला पतीसोबत मुंबईला गेली होती. गावी आल्यानंतर तिला ताप आल्याने तिचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता आता तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोनाबाधित महिलेचे पती हे मुंबईत आजारपणामुळे हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत होते. कोरोनाबाधित महिलाही त्याच्यासोबत मुंबई येथे गेली होती. मुंबईहून मापगाव येथे परतल्यानंतर तिला ताप आल्यानंतर तिचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. गुरुवारी तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेस अलिबाग येथील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.
कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात एक व्यक्ती आला असून तिचाही स्वॅब तपासणीसाठी पाठविला आहे. मापगाव हद्दीतील बहिरोळे हा भाग कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केले असून तो परिसर सील करण्यात आला आहे. अलिबाग तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही चारवर गेली आहे