महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भावी आमदार..! अलिबागचे नेते समाज माध्यमांवरच भागविताहेत आमदारकीची हौस

अलिबागेत इच्‍छुक उमेदवारांनी आपणच भावी आमदार असल्‍याचा प्रचार सुरू केला आहे. समाज माध्‍यमांवर हे सर्व इच्‍छुक उमेदवार झळकत आपली आमदारकीची हौस भागवून घेताना दिसत आहेत. विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होणार आहे.

By

Published : Sep 11, 2019, 12:26 PM IST

संग्रहित छायाचित्र

रायगड - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होणार आहे. त्‍यामुळे इच्‍छुक उमेदवार आणि त्‍यांच्‍या समर्थकांची धाकधूक वाढत चालली आहे. अलिबागेतही इच्‍छुक उमेदवारांनी आपणच भावी आमदार असल्‍याचा प्रचार सुरू केला आहे. समाज माध्‍यमांवर हे सर्व इच्‍छुक उमेदवार झळकत आपली आमदारकीची हौस भागवून घेताना दिसत आहेत. मात्र जिल्ह्यातील सहा मतदारसंघात अजूनही अलबेल असल्याचे चित्र आहे.

अलिबागचे नेते समाज माध्यमांवरच भागविताहेत आमदारकीची हौस

हेही वाचा-कोणाच्या जाण्याने काही फरक पडत नाही; अवधूतला शुभेच्छा - सुनील तटकरे

मागील विधानसभा निवडणुकीत आयत्‍यावेळी शिवसेनेत आलेले महेंद्र दळवी यांनी शेकापचे विद्यमान आमदार पंडित पाटील यांना जोरदार टक्‍कर दिली होती. तर काँग्रेसचे मधुकर ठाकूर हे तिसऱ्या क्रमांकावर गेले होते. तेव्‍हापासूनच महेंद्र दळवी यांनी पुढच्‍या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. गेल्‍या दोन वर्षापासून मतदारसंघात ते अधिक सक्रीय आहेत. लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांच्‍यासाठी जीव ओतून काम केलेले दळवी यांनी निवडणूक लढवण्‍याची सर्व तयारी केली आहे. भावी आमदार म्‍हणून त्‍यांचे पोस्‍टर समाजमाध्‍यमांवर झळकतानाही दिसताहेत. त्‍यांनी केलेली तयारी पाहता आजही शिवसेनेतर्फे दळवी यांनाच उमेदवारी निश्चित मानली जाते.

दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील विरोधक आणि जिल्‍हा परीषदेतील विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्‍हात्रे यांचेही पोस्‍टर्स मागील दोन चार दिवसापासून समाजमाध्‍यमांवर दिसत आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांचाही भावी आमदार असा उल्‍लेख केला जात आहे. त्‍यामुळे शिवसैनिकांमध्‍ये चलबिचल सुरू आहे. आता उमेदवार कोण? महेंद्र की सुरेंद्र, याची चर्चा केवळ शिवसैनिकांमध्‍येच नाही तर अलिबागच्‍या राजकीय वर्तुळातही सुरू आहे. वातावरण संभ्रमाचे असले तरी या संभ्रमाच्‍या वातावरणातही इच्‍छुकांचा जनसंपर्क कायम आहे. शिवसेनेचा मित्रपक्ष असलेला भाजपही समाजमाध्‍यमांवर मागे नाही. शिवसेना भाजपची युती होणार, असे सांगितले जात असले तरी मागील अनुभव पाहता कोणत्‍याही क्षणी काहीही होवू शकते. शिवाय जागांच्‍या अदलाबदलीत ही जागा भाजपकडे आली तर आयत्‍यावेळी घाई नको, अशीही भाजपची भूमिका दिसते. त्‍यामुळे भाजपनेदेखील या मतदारसंघात निवडणूक लढण्‍याची सज्‍जता केली आहे. विधानसभा मतदारसंघाचे अध्‍यक्ष अॅड. महेश मोहिते यांनीही मतदारसंघात जनसंपर्क वाढवला आहे. गावागावात जावून पक्षवाढीसाठी ते प्रयत्‍न करीत आहेत. समाजमाध्‍यमांवरील मोहितेंच्‍या पोस्‍टमुळे मतदारसंघात संभ्रमाचे वातावरण आहे.

शेतकरी कामगार पक्ष मात्र सावध पवित्रा घेत पाऊले टाकीत आहे. विद्यमान आमदार पंडित पाटील यांच्‍या समाजमाध्यमांवर पोस्‍ट समाजमाध्‍यमांवर पहायला मिळत आहे. मात्र ते कुठेही ट्रोल होणार नाही याची दक्षता घेत आहेत. पंडित पाटील लच शेकापचे उमेदवार असतील असे समाजमाध्‍यमांवरील पोस्‍टवरून स्‍पष्‍ट होत आहे. मात्र शेकापने विकासकामांचा डंका पिटण्‍याऐवजी आपली निशाणी मतदारांपर्यंत पोहोचवण्‍याचा प्रयत्‍न सुरू केला आहे. जिल्‍ह्यात शेकाप, कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादी कॉंग्रेस अशी युती आहे. मात्र अलिबागेतून कॉंग्रेसचा उमेदवार उभा राहणार असल्याची चर्चा आहे. कॉंग्रेसकडून माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र अॅड. प्रवीण ठाकूर आणि राजेंद्र ठाकूर यांच्‍यापैकी कुणालाही उमेदवारी मिळू शकते. दोघे किंवा त्‍यांचे समर्थक समाजमाध्‍यमांवर सक्रीय नसले तरी राजेंद्र ठाकूर यांनी मतदारसंघात दौरा करीत संपर्क सुरू ठेवला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details