रायगड- नववर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला मद्य घेऊन किल्ल्यांवर धिंगाणा घालाल तर शिवभक्तांच्या हाताचा प्रसाद खावा लागेल, अशी बातमी 'ईटीव्ही भारत'ने दिली होती. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पेब किल्ल्यावर ट्रेकिंगच्या नावाने मद्य, गांजा घेऊन 31 डिसेंबरची पार्टी करण्यास आलेल्यांना शिवभक्तांनी आपल्या हाताचा मार देऊन चांगलाच दम दिला.
पेब किल्ल्यावर 'थर्टी फर्स्ट' पार्टीसाठी आलेल्या तरुणांना शिवभक्तांचा प्रसाद - मद्यपी रायगड
रायगड जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक वारसा आहे. आजही गड, किल्ल्याच्या वास्तुने इतिहास जागा ठेवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड, किल्ले हे ऐतिहासिक वारसा आहेत. त्यामुळे पर्यटकांनी त्याचे पावित्र्य जपणे महत्त्वाचे आहे.
हेही वाचा -किल्ल्यांवर येणाऱ्या मद्यपी पर्यटकांवर कडक कारवाई इशारा
रायगड जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक वारसा आहे. आजही गड, किल्ल्याच्या वास्तुने इतिहास जागा ठेवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड, किल्ले हे ऐतिहासिक वारसा आहेत. त्यामुळे पर्यटकांनी त्याचे पावित्र्य जपणे महत्वाचे आहे.
29 डिसेंबरला गडकिल्ल्यांवर मद्य घ्याल तर शिवभक्तांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी बातमी 'ईटीव्ही भारत'ने दिली होती. असे असूनही रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील पेब किल्ल्यावर 31 डिसेंबरला ट्रेकिंगसाठी मुंबई, छत्तीसगड येथून 10 ते 12 जण आले होते. यावेळी पेब किल्ल्यावर काही शिवभक्त देखरेख करत होते. तेव्हा हे सर्व तरुण मद्य घेत, गांजा ओढत असल्याचे दिसले.
ट्रेकिंगच्या नावाखाली पेब किल्ल्यावर येऊन मद्य, गांजा घेणाऱ्या तरुणांना आपली ओळख सांगायला लावून तुम्ही येथे का आलात, याची विचारणा शिवभक्तांनी केली. हा कोणाचा किल्ला आहे, याबाबत विचारून जमिनीवर नाक घासायला लावून माफी मागायला सांगितली. तसेच यापुढे असे कृत्य करणार नाही व कोणाला करू देणार नाही, अशी शपथ त्यांना देण्यात आली.