महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हाधिकाऱ्यांनी भाडेकरूंच्‍या नावे परस्‍पर भाडेपट्टयांचे बेकायदा नूतनीकरण केले; अकबर पीरभॉय यांचा आरोप - lease

माथेरानमधील एक मालमत्ता तर परस्‍पर विकण्‍यात आल्‍याचा आरोप अली अकबर पीरभॉय यांनी केला आहे.

अकबर पीरभॉय यांचा जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप

By

Published : May 11, 2019, 11:31 PM IST

रायगड - माथेरानमधील जागेच्‍या भाडेपट्टा (लीज) नूतनीकरणाचे आदेश असतानाही प्रशासकीय यंत्रणा त्‍यात चालढकलपणा करीत आहे. तसेच काही भाडेकरूंच्‍या नावे परस्‍पर भाडेपट्टयाचे बेकायदा नूतनीकरण रायगडचे जिल्‍हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी केल्‍याचा आरोप अब्‍दुल हुसेन आदमजी पीरभॉय यांचे वारस अली अकबर पीरभॉय यांनी पत्रकार परिषदमध्ये केला आहे.

अकबर पीरभॉय यांचा जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप

अली अकबर पीरभॉय यांचे पूर्वज अब्‍दुल हुसेन आदमजी पीरभॉय यांनी ब्रिटीश काळात १५ लाख रूपये खर्चून माथेरानला रेल्‍वे आणली. त्‍या काळात दीड लाख रूपये खर्चून वीज आणली माथेरानच्‍या विकासाचे त्‍यांचे स्‍वप्‍न होते. सन १९१० मध्‍ये माथेरान येथील ५० एकर जमीन तत्‍कालीन सरकारकडून १५० रूपये एकर या दराने विकत घेतली होती. यावर प्‍लॉटींग करून तेथे बंगले बांधायचे ठरले होते. त्‍यानुसार १२३ प्‍लॉट तयार करण्‍यात आले. त्‍यापैकी ५७ प्‍लॉटवर बंगले बांधून ते भाडयाने दिले.

आता त्‍यावेळच्‍या सरकारबरोबर जमिनीच्‍या भाडेपट्टयाचा केलेला ९९ वर्षांचा करार २००९ मध्‍ये संपुष्‍टात आला. या कराराचे नूतनीकरण पीरभॉय यांच्‍या वारसांबरोबरच करावे, असे स्‍पष्‍ट आदेश कोकण आयुक्‍तांनी दिले आहेत. परंतु सरकारी यंत्रणा जागेच्‍या भाडेपट्टा कराराचे नूतनीकरण करण्‍यात चालढकल करीत आहे. सध्‍या जे भाडेकरू किंवा पोटभाडेकरू आहेत ते या जागांचा गैरवापर, परस्‍पर विक्री करीत असताना शासकीय यंत्रणा त्‍याकडे दुर्लक्ष करीत असल्‍याने तेथे अनागोंदी सुरू असल्‍याचा आरोप अली अकबर पीरभॉय यांनी केला आहे.

तत्‍कालीन जिल्‍हाधिकारी एच. के. जावळे यांनी पीरभॉय परीवाराच्‍या माथेरानमधील ९ मालमत्तांचे नूतनीकरण अनधिकृतरित्‍या दुसऱ्यांच्‍या नावे केले होते. ही बाब निदर्शनास आल्‍यानंतर ते रद्द करण्‍यात आले. आता पुन्‍हा रायगडचे जिल्‍हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी बेकायदेशीररित्‍या ३ मालमत्तांचे दुसऱ्याच्‍या नावे परस्‍पर नूतनीकरण केल्‍याचे अली अकबर पीरभॉय यांनी सांगितले. हे करत असताना शासनाच्‍या १९९९ मधील निर्णयातील तरतूदींचे उल्‍लंघन झाल्‍याचा आरोप पीरभॉय यांनी केला आहे. यासंदर्भात आपण जिल्‍हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांची भेट घेवून ही बाब त्‍यांच्‍या निदर्शनास आणून दिली. परंतु त्‍यांच्‍याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

माथेरानमधील एक मालमत्ता तर परस्‍पर विकण्‍यात आल्‍याचा आरोप अली अकबर पीरभॉय यांनी केला आहे. माथेरानचे नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी १ कोटी ५ लाख रूपयांना ही मालमत्‍ता खरेदी करून त्‍याची रीतसर नोंदणी केल्‍याचे त्‍यांनी सांगितले. मात्र यावर यंत्रणेने कोणतीही कारवाई केली नसल्‍याची खंत त्‍यांनी व्‍यक्‍त केली. या संपूर्ण प्रकरणात जे जे दोषी आहेत त्‍यांच्यावर कारवाई करावी आणि माथेरानच्‍या विकासात महत्‍वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पीरभॉय कुटुंबाला न्‍याय द्यावा, अशी मागणी अलीअकबर पीरभॉय यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details