महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवखा उमेदवार उभा राहिला तर सांभाळून घ्या, अजित पवारांचे पार्थ पवारांसाठी आवाहन - candidature

अजित पवार यांनी पनवेलमध्ये राष्ट्रवादी आणि शेकाप पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. यावेळी भाषण करताना अजित पवार यांनी मुलगा पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत कोणताही उल्लेख जरी केला नसला तरी नवखा उमेदवार उभा राहिला तर सांभाळून घ्या असे भावनिक आव्हान करून गुगली टाकली.

नवखा उमेदवार उभा राहिला तर सांभाळून घ्या - अजित पवार

By

Published : Mar 14, 2019, 11:47 PM IST

रायगड - राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या गळ्यात लवकरच मावळ मतदारसंघातून उमेदवारीची माळ पडणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. खुद्द अजित पवार हे स्वतः मुलासाठी मावळे बनवून मैदानात उतरले आहेत. एकीकडे पार्थ पवार हे पनवेल-उरण मध्ये दौरे करताना दिसून येत आहेत. त्यातच आता अजित पवार यांनी मुलगा पार्थ पवार यांच्या विजयासाठी जोर लावला आहे.

नवखा उमेदवार उभा राहिला तर सांभाळून घ्या - अजित पवार

अजित पवार यांनी पनवेलमध्ये राष्ट्रवादी आणि शेकाप पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. यावेळी भाषण करताना अजित पवार यांनी मुलगा पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत कोणताही उल्लेख जरी केला नसला तरी नवखा उमेदवार उभा राहिला तर सांभाळून घ्या असे भावनिक आव्हान करून गुगली टाकली. तर दुसरीकडे जो आई-बाबांचा ऐकत नाही तो जनतेचा काय ऐकणार? असा टोला त्यांनी सुजय विखे पाटील यांना लगावला.
मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले पार्थ पवार हे गेल्या काही महिन्यांपासून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेत आहेत. मावळ मतदारसंघातून मुलाला निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी स्वतः कंबर कसली आहे. पनवेलमधून कार्यकर्त्यांच्या बैठकीला सुरुवात करून मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी अजित पवारांनी सुरुवात केली आहे. पार्थ पवार यांच्यासाठी आपण पनवेलमध्ये आला आहात का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी नकार दिला. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले सांगितले.
आपल्या मुलासाठी आलेल्या अजित पवारांनी मात्र यावेळी भाजपात आलेल्या सुजय विखे पाटील यांना आपल्या टीकेतून चिमटे काढलेत. "जो आपल्या आई-वडिलांचं नाही ऐकू शकतो जनतेचं काय ऐकणार?" असा सवाल करून त्यांनी सुजय विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला. तसेच सुजय विखे पाटील यांच्या भाजपात येण्याने कसलाही परिणाम होणार नाही. अनेक व्यक्ती पक्षांमध्ये ये-जा करत असतात. एक व्यक्ती महत्त्वाची नसते, त्या व्यक्ती मागे किती जनाधार असतो, हे महत्त्वाचं असल्याचं देखील यावेळी अजित पवारांनी सांगितले.
एकीकडे लोकसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झालेला असताना मोदी सरकारवरही त्यांनी टीकास्त्र सोडले. देशाच्या संरक्षण खात्याचा कारभार चालणाऱ्या संरक्षण मंत्रालयात एवढी सुरक्षाव्यवस्था असताना राफेलची फाईल चोरीला जाते कशी? असा सवालही यावेळी त्यांनी केला. ६५० कोटींची राफेल विमाने १६०० कोटींना दिल्याचा पुरावा नष्ट करण्याचा हा एक डाव असल्याची टीका त्यांनी केली.
अजित पवार फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत, तर जे सरकार महत्त्वाच्या फायलींच्या संरक्षण करू शकत नाही, ते जनतेचे काय संरक्षण करतील? असा हल्लाबोल अजित पवार यांनी मोदी सरकारवर केला. मुलांसाठी सुरू केलेल्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयावर जोरदार टीका करायला देखील ते विसरले नाहीत. नोट बंदीच्या काळात अनेकांना स्वतःचे पैसे वापरायला अडचणी आल्या. बँकेसमोर रांगेत उभा राहून अनेकांचे जीव गेले. म्हणूनच आगामी निवडणुकीत मोदी सरकारला जागा दाखवायला हवी, असे देखील अजित पवार म्हणाले. त्यामुळे आता पार्थ पवार यांची उमेदवारी सध्या चांगलीच गाजत आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभांमध्ये काका-पुतण्याची केमिस्ट्री दिसत होती. मात्र सध्याचे वातावरण बघता पिता-पुत्रांची ही केमिस्ट्री मावळ मतदारसंघात चर्चेचा विषय ठरली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details