रायगड:राष्ट्रीय कॉंग्रेस नेते राहुलजी गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्र राज्यात नांदेड येथे दाखल झाल्यापासून रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत हे त्यांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. आज वाडेगाव ता.अकोला येथे भारत जोडो पदयात्रा आली असता राहुल गांधी यांना रायगड जिल्हा काँग्रेसच्या वतीने आगरी-कोळ्यांची मच्छिमार बोट भेट देण्यात आली आहे.
जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी: यावेळी महेंद्र घरत यांना राहुल गांधी यांच्या सोबत 7 मिनिटे संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले सोबत होते. त्यांनी स्व.बॅ.अंतुले साहेबांच्या रायगड जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी महेंद्र घरत यांच्या खांद्यावर दिली असल्याचे राहुल गांधी यांना सांगितले. तसेच जिल्ह्याध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर महेंद्र घरत यांनी रायगड कॉंग्रेसला नवसंजीवनी दिल्याचेही नाना पटोलेंनी राहुल गांधींना सांगितले आहे.