महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अडकलेले नागरिक पोहोचणार घरी... प्रशासनाकडे कळवा माहिती!

केंद्र शासनाने अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना त्याच्या गावी पाठविण्यासाठी सशर्त मुंजूरी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परराज्यातील अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलन करुन त्याची जाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिली आहे.

administration-ready-for-who-stuck-in-district-of-who-will-come-in-district
administration-ready-for-who-stuck-in-district-of-who-will-come-in-district

By

Published : May 2, 2020, 2:16 PM IST

रायगड- परराज्यात अडकलेल्या नागरिकांना आपापल्या राज्यात जाण्यासाठी शासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यातही याबाबतची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयात बाहेर जाणाऱ्या व्यक्तीची माहिती संकलन करण्याची सुरुवात सुरू झाली असल्याने कार्यालयाबाहेर नागरिकांनी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. परराज्यात जाणारे आणि परराज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना आपल्या गावी आणण्यासाठी, नेण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यामुळे लाॅकडाऊनमुळे अडकलेले हे नागरिक लवकरच आपल्या गावी पोहचणार आहेत.

अडकलेले नागरिक पोहोचणार घरी...

हेही वाचा-कोरोनाचा कहर..! जयपूरमध्ये 20 दिवसाच्या बालकाचा मृत्यू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाल्याने जिल्ह्यात हजारो परराज्यातील नागरिक अडकले आहेत. जिल्ह्यात संचारबंदीमुळे सर्व कामधंदा बंद असल्याने मजूर, कामगार यांच्या हाताला कामही नाही. त्यामुळे या नागरिकांची आर्थिक कोंडीही झाली आहे. वाहतूक सेवाही बंद असल्याने जाणेही कठीण झाले आहे. असे असले तरी प्रशासन त्यांची खाण्यापिण्याची सोय करीत आहेत. मात्र, गावाची ओढ लागल्याने या नागरिकांची घालमेल झाली आहे.

अडकलेले नागरिक पोहोचणार घरी...
केंद्र शासनाने अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना त्याच्या गावी पाठविण्यासाठी सशर्त मुंजूरी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परराज्यातील अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलन करुन त्याची जाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने माहिती संकलन करण्यास सुरुवात केली आहे.जिल्ह्यातील प्रशासनाने रायगड जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांसाठी https://forms.gle/fgEGNoGTxber4HRs5 लिंक बनवून त्यात आपली माहिती ऑनलाइन भरण्यास सांगितली आहे. तर जिल्ह्यातील नागरिक बाहेरच्या राज्यात अडकले असतील त्याच्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfOouvUI_w6sXNvmi7pxSoryj3e3d2b7zOkIwmL8kY9Swnnnw/viewform?usp=sf_link ही लिंक बनवली असून त्यात आपली माहिती भरण्यास सांगितली आहे. तसेच प्रत्येक तहसील कार्यालयात परराज्यातील नागरिकांची माहिती गोळा करण्याची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाबाहेर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यावेळी सोशल डिस्टन्सचे नियम पाळण्याच्या सूचना या नागरिकांना दिल्या जात आहेत. संकलित झालेली माहिती घेऊन ती प्रशासनाकडून ऑनलाइन पद्धतीने भरण्यात येणार आहे. या माहितीमध्ये व्यक्तीचे नाव, किती जण जाणार, मोबाईल नंबर, कुठून कुठे जायचे ही माहिती भरून घेतली जात आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यात अडकलेले तसेच रायगड जिल्ह्यातील परराज्यात अडकलेले नागरिक हे आपल्या इच्छीत स्थळी पोहचण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details