रायगड- विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणुकीसाठी मतदानाचे साहित्य वाटप कर्मचारी व अधिकारी वर्गाकडे केले. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. तर निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
22 लाख 66 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क हेही वाचा - प्लास्टिकमुक्त पालिका मुख्यालय करण्यासाठी पनवेल महापालिकेत अनोखी मोहीम
विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होत आहे. जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. 7 विधानसभा मतदारसंघात 22 लाख 66 हजार 679 मतदार असून 2 हजार 714 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत ईव्हीएम मशीन व मतदानाचे साहित्य मतदान केंद्रानिहाय वाटप करण्यात आले. यावेळी अधिकारी, कर्मचारी हे दिलेले साहित्य तपासून घेऊन मतदान केंद्राकडे रवाना झाले.
हेही वाचा - शरद पवारांचा पक्षातील लोकांवर विश्वास नाही, म्हणून त्यांच्यावर उन्हा-पावसात प्रचार करण्याची वेळ - उद्धव ठाकरे
मतदान केंद्रापर्यंत मतदान साहित्य व कर्मचारी, अधिकारी यांना पोहोचविण्यासाठी एसटी बसेसची सुविधा प्रशासनाने केली होती. मतदान केंद्रावर जाणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी यांना मतदान साहित्यासोबत ब्रश, साबण, टूथपेस्ट, मच्छर उदबत्ती, तेल या किटचे वाटपही करण्यात आले.