रायगड- मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत लवकरच सरकार कारवाई केली जाईल, असे आश्वासन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेही वाचा -रायगडात राष्ट्रवादीचे काटे फिरले; विजयराज खुळेंची घड्याळ सोडून धनुष्याला साथ
जन आशीर्वाद यात्रा अलिबाग येथे दाखल झाली असता, मुंबई गोवा महामार्ग तसेच मुंबईत पडलेल्या खड्ड्याबाबत आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. तर दुसरीकडे मुंबईतही रस्ते खड्डेमय झाले आहेत. एकीकडे कर्जमुक्त, दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त महाराष्ट्र बनविण्याचे स्वप्न पाहत असताना खड्डेमय मुक्त रस्ता कधी मिळणार याबाबत आदित्य ठाकरे याना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई गोवा या ठिकाणी रस्त्याची कामे जोरदार सुरू आहेत. मुंबई गोवा रस्त्याबाबत खासदार विनायक राऊत यांनीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दोन-तीनदा प्रश्न उपस्थित केला आहे. यावर लवकरच कारवाई होईल, अशी अपेक्षा असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
हेही वाचा - माजी मंत्री प्रभाकर मोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मुंबई, ठाणे, बदलापूर या ठिकाणीच्या रस्त्याबाबत विचारले असता, सेलिब्रिटी रस्त्यावर उतरले असल्याचे विचारले असता, सरकार याकडे लक्ष देत आहे. सेलिब्रिटीच नाही तर इतरांनाही त्रास होत आहे. याची जाणीव सरकारला आहे. सगळीकडे रस्त्याची कामे चालू आहेत. ज्या ठिकाणी मेट्रो, इन्फ्रास्ट्रक्चरची कामे चालू आहेत. त्या ठिकाणी ती झाल्यानंतर रस्ते होतील, असे ठाकरे यांनी सांगितले.