रायगड - ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळातील खातेवाटप आज झाले. मंत्रीमंडळ विस्तारानंतर सर्वांना खातेवाटपाची प्रतीक्षा होती. ती आता संपली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या अदिती सुनील तटकरे यांना राज्यमंत्री मंडळात संधी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे उद्योग, पर्यटन, क्रीडा, खनिकर्म, फलोत्पादन तसेच माहिती व जनसंपर्क या महत्वपूर्ण खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. अनेक चांगली खाती मिळाल्याने मी खुश असल्याची प्रतिक्रिया अदिती तटकरे यांनी दिली. तसेच शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
'विकासाबरोबर बेरोजगारीचे प्रमाण कमी करणार'
ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळातील खातेवाटप आज झाले. मंत्रीमंडळ विस्तारानंतर सर्वांना खातेवाटपाची प्रतीक्षा होती. ती आता संपली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या अदिती सुनील तटकरे यांना राज्यमंत्री मंडळात संधी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे उद्योग, पर्यटन, क्रीडा, खनिकर्म, फलोत्पादन तसेच माहिती व जनसंपर्क या महत्वपूर्ण खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
पहिल्यांदाच आमदार झालेल्या अदिती तटकरे यांचा राज्य मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला असून, त्यांच्यावर महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी टाकण्यात आली आहे. महत्वाच्या खात्यांची जबाबदारी दिल्याने अदिती तटकरे यांनी समाधान व्यक्त केले आहे. कोकणाचे प्रतिनिधित्व करताना पर्यटन व उद्योगासारख्या खात्यांतून जास्तीत जास्त विकास तसेच बेरोजगारी प्रमाण कमी करण्याला प्राधान्य देणार आहे. तसेच तरुणांना क्रीडा क्षेत्रात प्रगत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही तटकरेंनी सांगितले.
TAGGED:
Ncp Mla Aditi tatkare