रायगड -उरण मोरा सागरी पोलीस ठाण्यामध्ये तेल तस्करांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सदरची कारवाई पनवेल क्राईम झोन 2 च्या माध्यमातून करण्यात आली.
12 लाख 40 हजारांचा माल हस्तगत -
रायगड -उरण मोरा सागरी पोलीस ठाण्यामध्ये तेल तस्करांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सदरची कारवाई पनवेल क्राईम झोन 2 च्या माध्यमातून करण्यात आली.
12 लाख 40 हजारांचा माल हस्तगत -
उरण तालुक्याला मोठा सागरी किनारा लाभला आहे. जेएनपीटी बंदरासारखे जागतिक स्तरावरचे बंदरही याच हद्दीमध्ये आहे. यामुळे येथील सांगरी भागामध्ये मोठ्याप्रमाणात जहाजांची वर्दळ सुरू असते. याचाच फायदा घेत येथील सागर किनाऱ्यावर तेल तस्कर सक्रिय झाले आहेत. या तेल तस्करांच्या माध्यमातून समुद्रामध्ये उभ्या असणाऱ्या जहाजांमधून तेल काढून या तेलाची तस्करी करण्यात येते. सदरची तस्करी उरणच्या किनाऱ्यावरून होत असून, येथील तस्करांचा शोध अनेक वर्षं सुरू आहे. रविवारी मध्यरात्री पनवेल क्राईम झोन 2 च्या एका पथकाने उरणच्या पणजा खाडीमध्ये धाड टाकून कारवाई करत तेल तस्करीसाठी वापरात आलेली बोट आणि तीन हजार लिटर मोटर स्पिरिट तसेच हायस्पीड डिझेल असा एकूण 12 लाख 40 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या तस्करीमधील अखिलेश वसंत रावकुमार, लक्षमन पप्पू वाल्मिकी (चेटा) आणि दिनेश अर्जुन गायकवाड (कड्या) या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. कलम 286, 34 सह जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 37 सह मोटार स्पिरिट अँड हायस्पीड डिझेल ऑर्डर 2005 चे क्लॉज 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कायमचा उपाय होण्याची मागणी -
उरण सागरी भागामध्ये अनेकवर्षं जहाजांमधून तेल चोरून तस्करी केली जात आहे. अनेकदा कारवाई ही झाली आहे. मात्र, कारवाई नंतर पुन्हा काही काळाने तस्कर डोके वर काढतात. अशाच प्रकारची ही कारवाई केली असून, काहीच दिवसात पुन्हा तेल तस्करांचे डोके वर निघेल अशी चर्चा सामान्य जनता करत आहे. या तस्करांचा कायमचा उपाय केला पाहिजे अशी मागणीही होत आहे.