महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raigad Crime News : पोलिसाच्या ताब्यातून फिल्मी स्टाईलने आरोपीचे पलायन - पोलिसाच्या ताब्यातून फिल्मी स्टाईलने आरोपीचे पलायन

पेण मधील वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकावर किरकोळ कारणाने कोयत्याने वार करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकास अटक केली होती. आज तो आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला आहे.

ठाणे
ठाणे

By

Published : Jan 30, 2022, 11:13 PM IST

पेण (रायगड) -वडखळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाबळ जवळील कार्ली गावात झारखंड येथील पोकलन ऑपरेटर राजेंद्र यादव (42) रा.झारखंड याच्यावर त्याचा सहाय्यक बिरु गणेश महातो (19) रा.झारखंड, याने किरकोळ कारणावरून धारदार कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी करण्याची घटना 28 जानेवारीला घडली होती. या प्रकरणी वडखळ पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी बिरु महातो याला अटक केली होती. तो आज जेलमधून पळून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

भिंतीवरून उडी मारुन पळाला आरोपी -

आरोपीला पेण पोलीस ठाण्याच्या पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आले होते. आज रविवारी या आरोपीला प्रातविधीसाठी सकाळी बाहेर काढण्यात आले होते. मात्र, आरोपी बिरु महातो याने शौचालयाच्या बाजूस असलेल्या भिंतीवरून उडी मारुन पळाला. कस्टडीतील आरोपी पळाल्याची माहिती मिळताच पेण पोलिसांची एकच धावपळ उडाली. या आरोपीच्या शोधात जवळपास अख्खे पोलीस स्टेशन पेण शहर, मुंबई-गोवा महामार्ग, पेण खोपोली रोड, रेल्वे स्टेशन, बस स्टँड परिसरात शोध घेत होते. या आरोपीच्या तपासासाठी गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीसदेखील पेणचा परिसर पिंजून काढत होते. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत हा आरोपी पोलिसांना सापडून आला नव्हता.

दरम्यान, नुकताच पेण येथील एसबीआय बँकेच्या एटीएम मशीनवर दरोडा टाकून 56 लाख 34 हजार 800 रुपये रोकड घेऊन पळून गेल्याची घटना उघडकीस आली होती. आता जेलमधून आरोपी पळून गेल्याने पेण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा - Kirit Somaiya Criticized Sanjay Raut : 'संजय राऊत कुटुंबाची वाईनरीमध्ये पार्टनरशिप'

ABOUT THE AUTHOR

...view details