महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा महिला व बालकल्याण अधिकाऱ्यासह लेखापाल लाचलूचपत विभागाच्या जाळ्यात - District Women and Child Welfare Officer

४ लाख १० हजार रुपये मागितलेल्या लाचेपैकी पहिला 1 लाख रुपये हफ्ता स्वीकारताना रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. धान्य पुरवठ्याची बीले मंजूर करण्यासाठी लाच मागितली होती. लाचखोरीच्या प्रकरणात रायगडच्या महिला व बालकल्याण अधिकारी उज्ज्वला पाटील आणि त्यांचे लेखापाल भूषण घारे यांना अटक करण्यात आली आहे.

महिला व बालकल्याण विकास अधिकारी
महिला व बालकल्याण विकास अधिकारी

By

Published : May 4, 2021, 5:22 PM IST

रायगड - लाचखोरीच्या प्रकरणात रायगडच्या महिला व बालकल्याण अधिकारी उज्ज्वला पाटील आणि त्यांचे लेखापाल भूषण घारे यांना अटक करण्यात आली आहे. ४ लाख १० हजार रुपये मागितलेल्या लाचेपैकी पहिला 1 लाख रुपये हफ्ता स्वीकारताना रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. धान्य पुरवठ्याची बीले मंजूर करण्यासाठी लाच मागितली होती.

सृष्टी इंटरप्राईज कंपनीच्यावतीने महिला वसतीगृह कर्जत आणि शासकीय कुष्ठरोगी भिक्षेकरी गृह कोलाड येथे धान्यपुरवठा करण्यात आला होता. या धान्य पुरवठ्याची ४० लाख रुपयांची देयके अदा करायची होती. ज्यापैकी १४ लाख रुपयांची रक्कम तक्रारदार यांना यापुर्वी देण्यात आली होती. उर्वरीत देयके अदा करण्यासाठी उज्ज्वला पाटील यांनी ४ लाख १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

दोघांना केली अटक

याबाबत तक्रारदार यांनी अलिबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. पडताळणीनंतर आरोपी यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. लाचेचा पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. या प्रमाणे तक्रारदार यांनी लाचेची रक्कम उज्ज्वला पाटील यांना दिली. त्यांनी ती टेबलवर ठेवण्यास सागितली. तर लेखापाल भूषण घारे यांनी ती ताब्यात घेतली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर साळे, दीपक मोरे, विशाल शिर्के, महेश पाटील, कौस्तुभ मगर, आणि सूरज नाईक यांचा पथकाने ही कारवाई केली. गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

लाच मागितल्यास करा संपर्क

शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्ती लाचेची मागणी करत असेल तर ०२१४१-२२२३३१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख सुषमा सोनवणे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details