रायगड - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खासगी प्रवासी बस माडप बोगद्यात उलटली. या अपघातात २ महिलांचा मृत्यू झाला असून ५ प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला. सर्व जखमींना पनवेल कामोठे येथील रुग्णालयात हलविले आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर माडप बोगद्याजवळ खासगी बसचा अपघात; दोघींचा मृत्यू, 5 जखमी - highway accident
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खासगी प्रवासी बस माडप बोगद्यात उलटली. या अपघातात २ महिलांचा मृत्यू झाला असून ५ प्रवासी जखमी झाले आहेत.

बचावकार्य करताना पोलीस
बचावकार्य करताना पोलीस
या अपघातामध्ये दोन महिला ठार झाल्या आहेत. यातील एक महिला येमेन देशातील आहे. फातीमा सालेह (येमन, वय ८९) आणि कविता पलेंगे (ठाणे, वय ४१) अशी मृतांची नावे आहेत. जखमींमधील तिघांना अत्यावस्थ असल्याने मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बसमध्ये एकून २० प्रवासी होते. बोगद्यात अपघात झाल्याने बचाव कामात अडथळे येत आहेत. आय. आर. बी पथक, महामार्ग पोलीस आणि खालापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.