ST Service Loss in Raigad : रायगड विभागातील सुमारे 50 टक्के एसटी सेवा सुरू; प्रवासी नसल्याने आगारांना आर्थिक नुकसान
अनेक दिवस रस्त्यावरून एसटी गायब झाली होती. गेल्या महिन्यापासून काही कर्मचारी कामावर ( ST services in Raigad ) परतले आहेत. त्यामुळे एसटीच्या फेऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, एसटीवरील आर्थिक संकट अजूनही संपलेले ( ST Depo in economic loss ) नाही.
एसटी सेवा
By
Published : Feb 23, 2022, 7:28 PM IST
पेण (रायगड) - गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे, याकरिता पेण, अलिबाग, मुरूड, महाड, माणगांव, रोहा, कर्जत, श्रीवर्धन या रायगड विभागातील आठ आगारांतील कर्मचारी संपावर ठाम ( ST employees strike in Raigad ) आहेत. पण, अर्ध्याहून जास्त लालपरी एसटी रस्त्यावर ( 50 per cent ST service started in Raigad ) धावत आहेत.
अनेक दिवस रस्त्यावरून एसटी गायब झाली होती. गेल्या महिन्यापासून काही कर्मचारी कामावर ( ST services in Raigad ) परतले आहेत. त्यामुळे एसटीच्या फेऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, एसटीवरील आर्थिक संकट अजूनही संपलेले ( ST Depo in economic loss ) नाही.
ग्रामीण भागात बस कधी जाणार? बहुतांश कर्मचारी हे अद्याप संपात सामील असल्याने रायगड विभागातील एसटी महामंडळाचे फेऱ्यांचे व उत्पन्नाचे गणित खूपच ( Financial loss to ST depo ) कोलमडले आहे. सध्या सुरु असलेल्या फेऱ्या या मध्यम व लांब पल्ल्याच्या फेऱ्या आहेत. ग्रामीण भागातील बससेवा अद्याप पुर्णतः सुरुच झाली नसल्याने या भागातील प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. हेही वाचा-Mumbai Corona Update : मुंबईत १६८ नवे कोरोना रुग्ण, शून्य मृत्यूची नोंद
चार महिन्यांत ३८ कोटी ८२ लाखांचा फटका रायगड विभागातील पेण, अलिबाग, मुरूड, महाड, माणगांव, रोहा, कर्जत, श्रीवर्धन या आठ आगारातील कर्मचारी विलीनीकरण मागणीसाठी चार महिन्यांपासून संपात सामील झाले आहेत. चार महिन्यांत रायगड विभागाला ३८ कोटी ८२ लाख लाखांचा तोटा सहन करावा लागला आहे.