महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अभिषेक गाडेकर ठरला यंदाचा 'मिस्टर रायगड' - raigad competition

या स्पर्धेत रायगडच्या अभिषेकने बाजी मारली. तर, मुंबईचा रिषव वर्मा याने स्पर्धेत द्वितीय व पेणच्या विनय पाटील याने तृतीय क्रमांक पटकावला.

अभिषेक गाडेकर ठरला यंदाचा 'मिस्टर रायगड'

By

Published : Nov 10, 2019, 2:11 AM IST

रायगड - पेण नगरपरिषदेच्या भव्य मैदानावर स्वररंग तर्फे यंदाची 'मिस्टर रायगड स्पर्धा' मोठ्या जल्लोषात पार पडली. शुक्रवारी (8 नोव्हेंबर) ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रायगडच्या अभिषेकने बाजी मारली. तर, मुंबईचा रिषव वर्मा याने स्पर्धेत द्वितीय व पेणच्या विनय पाटील याने तृतीय क्रमांक पटकावला.

या स्पर्धेतील बेस्ट कॉस्टयूम मिथिलेश इंदुलकर (मुंबई), बेस्ट फोटोजनिक फेस तांबोळी (पेण), बेस्ट कॅटवॉक स्वप्नील ठाकूर (नवी मुंबई), बेस्ट हेअर स्टाईल निखिल वेदक (पेण) या स्पर्धकांनी पारितोषिके पटकावली. तर, सचिन घुगे यांना ज्युरी अवॉर्ड देऊन सन्मानीत करण्यात आले.

सर्व विजेत्यांना स्वररंगचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र साळवी, खजिनदार भारती साळवी, उपाध्यक्ष सुनिल पाटील, सचिव कौस्तुभ भिडे, सहसचिव मृगज कुंभार, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, अक्षता साळवी, भारत साठे, अभिराज कणेकर, अनिरुद्ध पवार, शैलेश रामधरणे, नेहा पाटील, तन्मय शिर्के, मानसी पंड्या, मानसी खेडेकर, किशोर जाधव आदि मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

रायगड सह मुंबई, नवी मुंबई, कोल्हापूर, लोणवळा, पेण, अलिबाग, खोपोली, माणगाव, महाड, पुणे, गोवा अश्या विविध भागांतील एकूण 26 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. ट्रेडिशन-इन्ट्रोड्यूस, वेस्टर्न आणि प्रश्नोत्तर फेरी अशा 3 फेऱ्यांमध्ये सादर करण्यात आलेल्या या स्पर्धेची उत्तम अशी कोरिओग्राफी अलिबागचे जयेश पाटील यांनी साकारली. तर निवेदक परेश दाभोलकर यांच्या उत्कृष्ट समालोचनाची साथ या स्पर्धेला लाभली.

या स्पर्धेचे परीक्षण अमित वैद्य, पर्णल कणेकर, नेहा पाटील यांनी केले. या स्पर्धेला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

ABOUT THE AUTHOR

...view details