रायगड - कोरोनाच्या या दुसऱ्या महामारीत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात रुग्णांना बेड मिळणे कठीण झालेले आहे. रायगड जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. ही अडचण ओळखून अलिबाग मधील 'आधार- द हेल्पिंग हँड्स' ही संस्था आरोग्य यंत्रणेच्या मदतीला धावून आली आहे. अलिबाग शहरातील जैन मंदिर धर्मशाळा हॉलमध्ये कोरोना रुग्णासाठी 25 बेड असलेले विलगीकरण कक्ष स्वः खर्चाने तयार केले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिजामाता कोविड सेंटरमधील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना या विनामूल्य विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. आधार- द हेल्पिंग हँड्सच्या या पुढाकाराने रुग्णालयातील ताण काही प्रमाणात कमी होणार आहे. या संस्थेच्या पुढाकारातून इतर सामाजिक संस्थांनी अशा प्रकारच्या मदतीसाठी पुढे येणे ही काळाची गरज ठरणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून आधारला 2 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर भेट
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी 'आधार-द हेल्पिग हँड्स'ने तयार केलेल्या विलगीकरण कक्षाला भेट दिली. आधार संस्थेने केलेल्या कार्याबद्दल त्याचे कौतुक केले. तसेच, विलगीकरण कक्षाला 2 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर भेट दिले. जेणेकरुन कोरोना रुग्णाला ऑक्सिजनची गरज लागल्यास त्याचा उपयोग होऊ शकेल.
'आधार-द हेल्पिंग हँड्स' ही संस्था कोरोना प्रादुर्भाव सुरू (2020) झाल्यापासून आपले सामाजिक दायित्व पूर्ण करत आहे. गेल्यावर्षी कोरोना काळात संस्थेने अनेक गरजूंना मदत केली. यावर्षी पुन्हा दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात थैमान घातले आहे. संस्थेचे सदस्य धनंजय म्हात्रे, भरत जैन आणि इतर सदस्यांनी एकत्रित येऊन पुन्हा प्रशासनाच्या मदतीला धावून जाणे गरजेचे आहे हे ओळखून विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, स्वतःच्या खिशातील पैसे टाकून आणि इतर दानशूर व्यक्तिच्या मदतीने विलगीकरण कक्ष अलिबाग जैन मंदिर सभागृहात सुरू केले.
25 बेडची व्यवस्था, 45 बेडची वाढविणार क्षमता