रायगड - मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर धावत्या ट्रकने पेट घेतल्याची घटना घडली आहे. खोपोलीजवळ बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ ही घटना घडली. पुणे लेनवर सकाळी 6 वाजता धावत्या ट्रकने पेट घेतला. या आगीत ट्रक संपूर्ण जळून खाक झाला. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. काही वेळानंतर ही आग विझवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. आय आर बी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलीस, डेल्टा फोर्स आणि देवदूत यंत्रणेने या घटनेत तातडीने उपाय केले. त्यामुळे जीवित हानी झाली नाही. तसेच इतर वाहनांना होणारा धोका टळला.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर धावत्या ट्रकने घेतला पेट - mumbai pune way news
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर धावत्या ट्रकने पेट घेतल्याची घटना घडली आहे. खोपोलीजवळ बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ ही घटना घडली. पुणे लेनवर सकाळी 6 वाजता धावत्या ट्रकने पेट घेतला.
![मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर धावत्या ट्रकने घेतला पेट मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर धावत्या ट्रकने घेतला पेट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10271398-1001-10271398-1610853172520.jpg)
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर धावत्या ट्रकने घेतला पेट
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर धावत्या ट्रकने घेतला पेट