रायगड - धर्मवीर आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यासाहित आमदार महेंद्र दळवी यांच्यासाहित जिल्हयातील आमदार व महाराष्ट्रातील इतर आमदार ( Maharashtra MLA )हे गुहावटी येथे गेले आहेत. म्हणून त्या सर्वांना बंडखोर ठरविले जात आहे. मात्र, हे सर्व बंडखोर नसून निष्ठावंत शिवसैनिक आहेत, असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेच्या सेनेच्या माजी गटनेत्या मानसी दळवी यांनी केले आहे. अलिबाग रेवस बाह्यवळण येथील आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यालयाजवळ जिल्हयातील तीनही आमदार यांच्या समर्थानात आयोजित मेळाव्यात केले आहे.
यावेळी व्यासपीठावर आमदार महेंद्र दळवी गटाचे तालुका प्रमुख राजा केणी, मुरूडचे माजी तालुका प्रमुख निलेश घाटवळ, मुरूड संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत बेलोसे, रोहा येथील उस्मान रोहेकर, शुभांगी करडे, संतोष निगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
गुहावटी येथे गेलेले आमदार हे बंडखोर नसून निष्ठावंत शिवसैनिक - मानसी दळवी
याप्रसंगी मानसी दळवी यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असून, सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक आमदार त्यांना पालकमंत्री पद देण्यात आले. हे चुकीचे आहे. मात्र. आम्ही आमच्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले असल्यामुळे आम्ही निमूटपणे सहन केले. मात्र, रायगडच्या पालकमंत्री यांनी प्रत्येकवेळी, प्रत्येक कामात शिवसेना नेत्यांना सहित आमदार यांना डावलण्यात येऊ लागले. निधी देताना हात आखडता घेणे. पालकमंत्री होऊन तीन वर्षे झाली, तरी आद्यपही शासकीय कमिटीची पदे वाटप करण्यात आले नाही. नियोजन निधीमध्ये आम्हाला डावळणे आदी अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला हे पाऊल उचलावे लागत आहे. रायगड जिल्हयातील आमदार भरत गोगावले आणि महेंद्र थोरवे यांच्या बैठकी ह्या आमच्या निवासस्थानी होत असत. यावेळी त्यांच्यावर पालकमंत्री यांच्याकडून होणारा उद्रेक बाहेर पडत असतं. त्याबाबत त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. मात्र, त्याबाबत कोणत्याही प्रकारची दखल ही घेतली नाही.