रायगड - अलिबाग येथे मंत्र्याच्या कारवर चालक म्हणून काम करीत असलेल्या पोलीस नाईक प्रशांत ठाकूर (35) याने शिवाजी नगर येथे आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्रशांत याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
प्रशांत डिव्ही कारवर होता चालक
प्रशांत ठाकूर हा अलिबाग पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून काम करीत होता. प्रशांत याची नुकतीच मंत्री महोदय यांच्या डिव्ही कारवर चालक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. प्रशांत याची पत्नीही रायगड पोलीस दलात पोलीस अधीक्षक कार्यालयात काम करते. आठ दिवसापासून प्रशांत याची पत्नी ही माहेरी गेली होती. त्यामुळे प्रशांत हा घरी एकटाच राहत होता.