रायगड - खोपोली शहरातील मुळगाव या भागात गांजा विक्री करणारी टोळी कार्यरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे 25 मार्च रोजी मुळगावात हनुमान मंदिर परिसरात सापळा रचून कारमध्ये गांजाचा साठा व या कामासाठी वापरण्यात येणारी कार असा एकूण 2 लाख 76 हजार 700 रुपयांचा ऐवज जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
खोपोलीत गांजा विक्री करणारी टोळी गजाआड; अमली पदार्थ जप्त - गांजा विक्री करणारी टोळी गजाआड
25 मार्च रोजी मुळगावात हनुमान मंदिर परिसरात सापळा रचून कारमध्ये गांजाचा साठा व या कामासाठी वापरण्यात येणारी कार असा एकूण 2 लाख 76 हजार 700 रुपयांचा ऐवज जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई - खोपोली शहरात गांजा विक्री करण्यासाठी टोळी कार्यरत असल्याची गुप्त माहिती 25 मार्च रोजी सह्य पोलीस निरिक्षक पवनकुमार ठाकूर, पोलीस हवालदार पाटील, पोलीस हवालदार खैरनार, पोलीस हवालदार दबडे, पोलीस हवालदार हंबीर, चालक स.फौ.कोरम ही टीम गस्तीवर असताना पोलीस हवालदार राजेश पाटील यांना गांजा विक्रीची मिळालेल्या गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे या पथकाने मुळगाव खोपोली गावखच्या हद्दीत खोपोली हनुमान मंदिर या ठिकाणी छापा टाकला आणि आरोपी हमजा निजामुद्दीन खोपोलीवाला (वय 32 वर्ष, रा.अशियाना बिल्डिंग, 4था माळा, फ्लॅट नंबर 401, खोपोली बाजार पेठ, तालुका खालापूर, जिल्हा रायगड) याला अटक केली. तसेच त्याच्या ताब्यातील एक वॅगनर कार (एम.एच.01/BF/0282) मध्ये 6 किलो 394 किलो ग्राम वजनाचा एकूण 76,700 रु. किंमतीचा मादक अमली पदार्थ गांजा जप्त केला. या कामासाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण 2,76,70 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . हमजा निजामुद्दीन खोपोलीवाला, वय 32 वर्ष, रा.अशियाना बिल्डिंग, 4था माळा, फ्लॅट नंबर 401, खोपोली बाजार पेठ यांना अटक करण्यात आले आहे. सदर बाबत आरोपी याच्याविरुद्ध खोपोली पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.