रायगड - सह्याद्रीच्या कुशीत असणारा खंडाळा घाट पर्यटकांसाठी आता हिरवळीने चांगलाच सजला आहे. पावसाळ्यात जणू काही तो पर्यटकांना खुणावत आहे. येथे पर्यटकांची या दिवसांत कायम गर्दी होत असते. घाटातून पावसाळ्यातील दिसणारे सह्याद्री डोंगर रांगेतील निसर्ग सौदंर्य अनेक पर्यटकांना भुरळ पाडत असते. खंडाळा घाटाच्या दिशेने पावसाळ्यात पर्यटकांचे पाऊले आपोआप वळत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
खंडाळा घाटात पर्यटकांची गर्दी, कोरोनातून थोडासा दिलासा मिळाल्याचे चित्र - crowd of tourists
सह्याद्रीच्या कुशीत असणारा खंडाळा घाट पर्यटकांसाठी आता हिरवळीने चांगलाच सजला आहे. पावसाळ्यात जणू काही तो पर्यटकांना खुणावत आहे. येथे पर्यटकांची या दिवसांत कायम गर्दी होत असते.
![खंडाळा घाटात पर्यटकांची गर्दी, कोरोनातून थोडासा दिलासा मिळाल्याचे चित्र खंडाळा घाटात पर्यटकांची गर्दी, कोरोनातुन थोडासा दिलासा मिळाल्याचे चित्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12108187-261-12108187-1623493831530.jpg)
कोरोनाची लाट ओसरल्याचा आनंद
थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे लोणावळा-खंडाळा येथे दरवर्षी पर्यटकांनी गजबजून जाते. नुकताच कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला आहे. दरम्यान, अनेक दिवसांपासून घराबाहेर न पडलेले लोक आणि विशेषतः तरुणाई आता पावसाचा आनंद घेत आहे. या घाटात रिमझिम पावसाबरोबर येणाऱ्या धुक्याचे प्रमाणही वाढत आहे. हे थंड हवेचे ठिकाण असल्याने पर्यटक येथे मोठा आनंद लुटतात. हा खंडाळा घाट मुंबईपासून जवळ असल्याने, मुंबईला जाणारे बहुतांश लोक इथे काही काळ थांबतात. खंडाळा येथे अमृतांजन ब्रिज, राजमाची किल्ला, राजमाची पॉईंट, खंडाळा घाट, दस्तुरी घाट आदी पर्यटकांना पाहायला असल्यामुळे, पर्यटक याठिकाणी हवेतील गारव्याचा आनंद लुटण्यासाठी आवर्जून येतात.