महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परदेशातून आलेले 88 जण आरोग्य यंत्रणेच्या निगराणी खाली

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. 13 मार्चपासून जिल्ह्यात परदेशातून आलेल्या 88 जणांना जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून देखरेखीखाली ठेवले आहे. जिल्ह्यातील पाली, महड गणेश मंदिर, घारापुरी लेणी, इमॅजिका पार्क यांसह एनडी स्टुडिओ, समुद्र किनारे या ठिकाणी नागरिकांना बंदी केली.

Raigad Corona
रायगड कोरोना

By

Published : Mar 17, 2020, 8:15 AM IST

Updated : Mar 17, 2020, 8:27 AM IST

रायगड -13 मार्चपासून जिल्ह्यात परदेशातून आलेल्या 88 जणांना जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून देखरेखीखाली ठेवले आहे. जिल्ह्यातील पाली, महड गणेश मंदिर, घारापुरी लेणी, इमॅजिका पार्क यांसह एनडी स्टुडिओ, समुद्र किनारे या ठिकाणी नागरिकांना बंदी केली, असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील शाळाही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.

88 जण आरोग्य यंत्रणेच्या निगराणी खाली

कोरोना विषाणूचे महाराष्ट्रात 36 बाधित रुग्ण आढळले आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोनाचा एक बाधित रूग्ण आढळला आहे. त्याच्यावर मुंबईतील कस्तुरबा गांधी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन जास्त सतर्क झाले आहेत. जिल्ह्यात 13 मार्चपासून 88 जण परदेशातून दाखल झाले आहेत. परदेशातून आलेल्या या नागरिकांना शासनाच्या निर्देशानुसार देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे.

हेही वाचा -CORONA : राज्यातील सर्वच शाळांना सुट्टी.. कोरोनाग्रस्तांची संख्या ३९ वर, निवडणुकांवरही सावट

88 पैकी 41 जणांना विशेष कक्षात तर 47 जण घरी राहून उपचार घेत आहेत. या 88 जणांच्या रक्ताचे नमुने डॉक्टरांनी घेतले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. 14 दिवस हे नागरिक आरोग्य यंत्रणेच्या निगराणी खाली राहणार आहेत. या 88 जणांना कोरोना लागण झालेली नाही. फक्त खबरादारीच्या दृष्टीने त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा असे, आवाहनही जिल्हाधिकारी चौधरी यांनी केले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व शाळा, एनडी स्टुडिओ, समुद्रकिनारे यांवर नागरिकांना प्रवेश बंदी केली आहे. सार्वजनिक आणि खासगी कार्यक्रम रद्द करण्याचे शासनाचे आदेश जिल्ह्यातही लागू केले आहेत.

Last Updated : Mar 17, 2020, 8:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details