रायगड - डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात होणाऱ्या 87 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुका कोरोनाची दुसरी लाट येण्याची संभाव्य शक्यता असल्याने निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या आहेत. ऐन थंडीत निवडणूक आयोगाने झटका दिल्याने मोर्चेबांधणी बंद पडल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील 'या' ग्रामपंचायतीची संपतेय मुदत -
जुलै ते डिसेंबर या कालावधीत अलिबाग तालुक्यातील 4, पेण 7, पनवेल 24, उरण 6, कर्जत 9, रोहा 20, माणगाव 5, महाड 5, श्रीवर्धन 4, म्हसळा 3 अशा एकूण 87 ग्रामपंचातींची मुदत संपत आहे. निवडणूक आयेगाने कोरोनाची परिस्थिती काय आहे? याबाबत जिल्हा प्रशासनाकडून माहिती मागितली होती. त्यानुसार जिल्ह्यातील 87 ग्रामपंचातींच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यात वर्तवली जात होती. मात्र, कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आल्याने या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
रायगमधील 87 ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द... हेही वाचा -बेघरांना जिव्हाळा संस्थेत मिळतोय आधार; ६३ जणांचा केला जातोय सांभाळ
निवडणुकीच्या अनुषंगाने संभाव्य उमेदवारांचा सुरू होती मोर्चे बांधणी -
डिसेंबर महिन्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम होणार होता. त्यानुसार 84 ग्रामपंचायतीत निवडणुकीचा उत्साह ऐन थंडीत वाढत होता. 84 ग्रामपंचायती निवडणुकीत हजारो संभाव्य उमेदवारांनी मोर्चे बांधणी सुरू केली होती. प्रत्येक राजकीय पक्ष हा जिंकण्याच्या दृष्टीने मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत होता. पार्ट्या, कार्यक्रम, सहली यांचे प्रयोजन उमेदवाराकडून सुरू झाले होते. हौसे नौसे कार्यकर्तेही तेजीत होते.
उमेदवारांचा हिरमोड -
ऐन थंडीत निवडणुकीचा फिवर चढला असताना आणि मोर्चे बांधणी झाली असताना अचानक निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संभाव्य उमेदवारांचा हिरमोड झाला असून निवडणुकीचा उत्साह एका झटक्यात थंड पडला आहे.
नवीन मतदार नोंदणी आणि संभाव्य कोरोना लाटेने निवडणुका रद्द -
1 जानेवारी 2020पर्यंत मतदार यादी पूर्ण झाली आहे. पुढील कार्यक्रम घेऊन नवीन मतदार नोंदणी करायची आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने होणाऱ्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण केलेली होती, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.