रायगड - राज्यातील वाढत्या स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी एका चिमुकलीने सायकल प्रवास सुरू केला आहे. आई एकवीरा देवीच्या कार्ला लोणावळा ते बालकुम असा १२० किमी प्रवास करणारी ही चिमुकली नुकतीच पनवेलमध्ये पोहोचली आणि तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सई ठाकूर (८) असे या चिमुकलीचे नाव आहे.
प्रत्येकाची प्रवास करण्यामागची कारणे वेगवेगळी असतात मात्र, एखाद्या ध्येयाने पछाडून प्रवासाला निघणारे विरळेच असतात. अशीच ठाण्यातली सई ठाकूर ही ध्येयवेडी चिमुकली. २१व्या शतकातही आपल्या समाजात मुलगा-मुलगी हा भेद दिसून येतो. मात्र, समाजातील ही मानसिकता बदलण्याचे आव्हान या मुलीने स्वीकारले आहे. स्त्री भ्रूण हत्येविरोधात जनजागृतीकरता सईने एकवीरा देवीच्या कार्ला लोणावळापासून आपला प्रवास सुरू केला आहे. ती सायकलवरून अनेक गावांना भेट देत गावकऱ्यांमध्ये भ्रूण हत्येविरोधात जनजागृती करत आहे.
हेही वाचा -महाड ते रायगड राष्ट्रीय महामार्ग अडकला टक्केवारीत