महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raigad News : कौतुकास्पद! आठ वर्षीय हर्षिती भोईरचा आणखी एक विक्रम, केदारकंठ ट्रेक विक्रमी वेळेत सर - हर्षिती भोईरचा आणखी एक विक्रम

उरण तालुक्यातील गडकन्या हर्षिती भोईर हिने उत्तरांखंड येथील केदारकंठ हा कठीण ट्रेक उणे सहा अंश तापमानात निर्धारीत वेळेपेक्षा कमी वेळेत पार केला. हे करून तिने सर्वांनाच अचंबीत केले आहे. या आधी तिने 12 तासात 5 गड सर करून आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे.

Harshiti Bhoir
हर्षिती भोईर

By

Published : Feb 11, 2023, 9:58 AM IST

हर्षिती भोईरची केदारकंठ ट्रेक विक्रमी वेळेत सर

उरण : उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील हर्षिती भोईर हिने आजवर अनेक ट्रेक, अवघड किल्ले सर केले आहेत. वजीर सुळका हा अत्यंत कठीण चढई असणारा सुळका दोनदा सर केला आहे. याचबरोबर तिने अवघ्या पाच वर्षाचे वय असताना तिने 12 तासात, सर्वांनाच आश्चर्यचा धक्का दिला होता. तिने तिची ट्रेकिंगची आवड पुढे जोपासण्याची इच्छा दर्शवली आहे. तिला सर्वात उंच आणि काठीण अशा एव्हरेस्ट शिखर चढाई करायची आहे.

चार दिवसांचा ट्रेक दोन दिवसात पूर्ण :याचाच एक भाग म्हणून केदारकंठ हा ट्रेक तिने केला आहे. समुद्र सपाटीपासून 12,500 फूट उंच, संपूर्ण बर्फाने वेढालेला, उणे सहा अंश तापमान, हाडे गोठवणारी थंडी, सततची हिमवृष्टी अशा परिस्थितीमध्ये अवघ्या आत वर्षीय हर्षितीने चार दिवसांचा ट्रेक अवघ्या दोन दिवसात पूर्ण करत, दिग्गज ट्रेकरना आवाक केले आहे. तिने केलेल्या या विक्रमचे तेथील उपस्थित ट्रेकर वर्गाने स्वागतं करत तिचे कौतुकाही केले आहे. तर तिच्या या विक्रमची नोंद उरण तालुका मराठी पत्रकार संघने घेत तिच्या स्वागताची तयारी केली आहे.

आता वेध एव्हरेस्टचे :उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील हर्षिती भोईर हिने आजवर अनेक ट्रेक, अवघड किल्ले सर केले आहेत. तर वजीर सुळका हा अत्यंत कठीण चढई असणारा सुळका दोनदा सर केला आहे. याचबरोबर तिने अवघ्या पाच वर्षाचे वय असताना तिने 12 तासात सर करून, सर्वांनाच आश्चर्यचा धक्का दिला होता. तिने तिची ट्रेकिंगची आवड पुढे जोपासण्याची इच्छा दर्शवली असून, तिला सर्वात उंच आणि काठीण अशा एव्हरेस्ट शिखर चढाई करायची आहे. याचाच एक भाग म्हणून केदारकंठ हा ट्रेक तिने केला आहे. समुद्र सपाटिपासुन 12500 फूट उंच, संपूर्ण बर्फाने वेढालेला, उणे सहा अंश तापमान, हाडे गोठवणारी थंडी, सततची हिमवृष्टी अशा परिस्थितीमध्ये अवघ्या आत वर्षीय हर्षितीने चार दिवसांचा ट्रेक अवघ्या दोन दिवसात पूर्ण करत, दिग्गज ट्रेकरना आवाक केले आहे. तिने केलेल्या या विक्रमचे तेथील उपस्थित ट्रेकर वर्गाने स्वागतं करत तिचे कौतुकाही केले आहे. तर तिच्या या विक्रमची नोंद उरण तालुका मराठी पत्रकार संघने घेत तिच्या स्वागताची तयारी केली आहे. आता वेध एव्हरेस्टचे


कठीण गडकिल्ले सर :नवी मुंबई, नेरुळ येथील रेआन इंटरनॅशनल स्कुलमध्ये दुसरी इयत्तामध्ये शिकणारी हर्षिती राज्यातील अनेक कठीण गडकिल्ले सर करून, वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपल्या विक्रमांची नोंद करणारी हर्षिती आता सर्वात कठीण आणि सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर सर करण्याची स्वप्न बघत आहे. यासाठी तिने प्रयत्न देखील सुरु केले असून, तिच्या या प्रयत्नामध्ये तिचे पालक तिला सहकार्य करत आहेत. वडील कविराज भोईर हे सिडको, उलवे विभागाच्या अग्निशमन दलामध्ये कार्यरत असून, हर्षितीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतोनात मेहनत घेत आहेत.

हेही वाचा :Sharad Pawar : राज्यात पत्रकारांचीच हत्या होत असेल तर परिस्थिती चिंताजनक -पवार

ABOUT THE AUTHOR

...view details