महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्गात दंगा केला म्हणून शिक्षकाची सहावीच्या विद्यार्थ्याला हँगरने मारहाण - raigad school

दंगामस्ती केली म्हणून सहावीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने हँगरने बेदम मारहान केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना खालापूर आसरेवाडी येथील श्री.स्वामी नारायण गुरुकुल इंटरनॅशनल शाळेत घडली होती. शाळेतील वार्डन असलेल्या शिक्षकाने हे कृत्य केले होते. याबाबत शिक्षकाविरोधात पालकांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शिक्षकाने सहावीच्या विद्यार्थ्याला केली हँगरने मारहाण

By

Published : Aug 26, 2019, 9:55 PM IST

रायगड - रेवदंडा हायस्कूलमधील शिक्षकाने अभ्यास केला नाही म्हणून चौथीच्या विद्यार्थ्याला मारहाण केली होती. ही घटना ताजी असतानाच खालापूर आसरेवाडी येथे अशीच घटना घडली आहे. सहावीतील विद्यार्थ्याने दंगामस्ती केली म्हणून शिक्षकाने त्याला हँगरने बेदम मारले. ही घटना श्री स्वामी नारायण गुरुकुल इंटरनॅशनल शाळेत घडली होती. याबाबत शिक्षकाविरोधात पालकांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कल्याण येथील सर्वेश कुमार तिवारी यांचा मुलगा आदित्य तिवारी हा श्री स्वामी नारायण गुरुकुल इंटरनॅशनल शाळेत सहाव्या वर्गात शिकतो. आदित्य हा शाळेच्या वस्तीगृहातच राहत होता. १५ ऑगस्ट रोजी आदित्यच्या शाळेत पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी आदित्यचे पालक शाळेत आले होते. त्यावेळी आदित्यला कडकडून ताप भरला होता.

वसतिगृहाचे वार्डन आनंद यांनी आदित्यच्या पालकांना १० ऑगस्ट रोजी तुमचा मुलगा दंगामस्ती करतो म्हणून त्याला मारले आहे. याबाबत तुम्ही कुठेही तक्रार करू नका. पुन्हा असे करणार नाही असे सांगितले. त्यावेळी पालकांनी आदित्यचा शर्ट काढून बघितले असता त्यांना आपल्या मुलाच्या शरीरावर माराचे काळे डाग दिसले. याबाबत पालकांनी शिक्षक आनंद यास जाब विचारला.

त्यानंतर पालकांनी आदित्यला कल्याण येथे नेले व त्यावर रुग्णालयात उपचार केले. त्यानंतर सदर घटनेच्या विरेधात पालकांनी १९ ऑगस्ट रोजी खालापूर पोलीस ठाण्यात शिक्षक आनंद यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. श्री स्वामी नारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कुलमध्ये या आधीही विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून मारहाण झाल्याची घटना घडली होती. मात्र याबाबत शाळा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. यात विशेष म्हणजे पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतरही आरोपी शिक्षकाला अजून अटक करण्यात आलेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details