रायगड - जिल्ह्यात इतर तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत आहेत. अलिबाग तालुका मात्र कोरोनाच्या विळख्यात अडकलेला आहे. तालुक्यातील चौल, नागाव, रेवदंडा, कुरुळ, नवे नवगाव या ग्रामपंचायती हद्दीत कोरोना रुग्णाची संख्या वाढली आहे. त्यामुळे तालुक्यातील ही सहा गावे कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. याबाबत अलिबाग प्रांताधिकारी यांनी आदेश काढले आहेत. कोरोनाबाधित क्षेत्रातील गावात आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून लवकरच ही गावे कोरोनामुक्त होतील, अशी माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली आहे.
तालुक्यात 63 पैकी 61 ग्रामपंचायत हद्दीतील गावात कोरोना रुग्ण
रायगड जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले असून मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. अलिबाग तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट ही धोकादायक ठरली आहे. तालुक्यात 63 ग्रामपंचायती असून वरंडे आणि मानकुळे सोडता 61 ग्रामपंचायतीत कोरोनाचे रुग्ण आहेत. तालुक्यातील रेवदंडा 66, चौल 89, नागाव 82, चेंढरे 70, कुरुळ 57, नवे नवगाव 47, बेलोशी 40 या ग्रामपंचायतीत कोरोना रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. अलिबाग तालुक्यात सद्यस्थितीत 1 हजार 240 कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर 423 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
हेही वाचा -मराठा समाजाची दिशाभूल होऊ देणार नाही; १६ जूनपासून मूक आंदोलन - संभाजीराजे छत्रपती